शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निमा  निवडणुक : नऊ दिवसांत एकच अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:24 IST

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्रीस प्रारंभ करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, २२ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे व २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. नऊ दिवसांत सहा अर्जांची विक्री झाली असून, कार्यकरिणीसाठी तरुण अग्रवाल यांचा अर्ज दाखल झाला आहे.  एकता पॅनलच्या माजी अध्यक्षांच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांची इच्छा जाणून घेण्यात आली आहे. कोण उमेदवार कोणत्या पदासाठी इच्छुक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची नाडी एकता पॅनलच्या समितीच्या हातात आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून वर्णी लागण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. समितीच्या निर्णयानुसार एकता पॅनलचे सर्व उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत.

टॅग्स :MIDCएमआयडीसीElectionनिवडणूक