शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवार (दि.२२) पासून ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवार (दि.२२) पासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे नाशिकमध्ये केव्हाही संचारबंदी लागू होऊ शकते, अशी चर्चा असताना रविवारी पालकमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या ६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या अवघी १११ इतकी होती. दि. ७ फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेली आणि २१ फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या १,७३१ पर्यंत पोहोचली. मागील पाच दिवसांत तर रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक असल्याचेदेखील समोर आल्याने काही निर्णय घ्यावे लागले असल्याचे भुजबळ म्हणाले. गेल्या पाच दिवसांत नाशिक शहरात ४१०, ग्रामीण भागात ७७, तर मालेगावमध्ये १४० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता नागरिकांमधील बेफिकीरी वाढल्याचा निष्कर्ष समोर आल्याने संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

रात्री ११ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नाशिककर जबाबदारीने वागले नाहीत, तर रात्री ८, ९ किंवा १० वाजेपासून संचारबंदी वाढविली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना रोखण्याची जबाबदारी ही नाशिककरांची असून, त्यांनी खबरदारी घेणे अपेक्षित आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर आठ दिवसांतील परिस्थितीत किती सुधारणा झाली हे पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

या काळात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील. पोलीस, जिल्हा, तसेच महापालिका प्रशासनाला संचारबंदीच्या काळात कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लग्ण सोहळ्यांना होणारी गर्दी, तसेच बाजारपेठेतील गर्दी पाहता संचारबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. नाशिककरांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

--इन्फो--

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहाणार आहे. दूध वितरण, भाजीपाला, वृत्तपत्र विक्रेते, मेडिकल, दवाखाने या सेवा सुरूच राहणार आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्यांनी योग्य ती माहिती पोलिसांना देणे आवश्यक राहाणार आहे.