शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

रेल्वेस्थानकात साकारणार नवीन मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:11 IST

मनमाड : येथील रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, तिकीट बुकिंग कार्यालय ते फलाट क्रमांक एकपर्यंत गर्डर बसविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : येथील रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून, तिकीट बुकिंग कार्यालय ते फलाट क्रमांक एकपर्यंत गर्डर बसविण्यात आले. या कामामुळे फलाट क्रमांक एकवरून जाणाऱ्या गाड्या २ वरून रवाना करण्यात आल्या.उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वेस्थानकावर सुरुवातीला एकच पादचारी पूल होता. त्याला खेटून नवीन पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ असलेल्या रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डपासून फलाट क्रमांक सहापर्यंत दीडशे मीटर लांबीचा हा अत्यधुनिक पूल तयार केला जात आहे. यावेळी स्टेशन प्रबंधक पी. के. सक्सेना, सुधीर गरुड, मुख्य तिकीट निरीक्षक एस.पी. कांबळे, रेल्वेचे अधिकारी जे.एम रामेकर, अंकित गर्ग, नरेंद्र पाटील, गुना शेखर, पुष्पेंद्र सिंग, जी.पी. सरनाईक आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रेसुब निरीक्षक के.डी. मोरे, उपनिरीक्षक रजनीश यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या पुलासाठी आधी पिलर उभे करण्यात आले असून, आज त्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात  आले. या कामासाठी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. गर्डर बसविण्याअगोदर पार्सल आॅफिस ते फलाटावर जाणाऱ्या विद्युतवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर १४० टन वजन उचलणाऱ्या दोन क्रेनच्या मदतीने चार गर्डर पिलरवर बसवण्यात आले.पूल बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्ट यासह इतर सर्व साहित्य हे मनमाडच्या रेल्वेवर्क शॉपमध्येच तयार करण्यात आले आहेत. हा पूल लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असून,  दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ही लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.