शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यू पेन्शन स्कीम’ तोट्याचीच

By admin | Updated: November 3, 2014 00:16 IST

सुरेंद्र पालव : टपाल क र्मचाऱ्यांच्या विभागीय अधिवेशनात प्रतिपादन

नाशिक : शासनाची ‘न्यू पेन्शन स्कीम’ अर्थान नवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून त्याला आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनने नेहमीच विरोध दर्शविला आहे. सदर योजना रद्द करण्यासाठी संघटनेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन सहायक सर्क ल सेक्रेटरी ग्रुप ‘सी’ मुंबईचे सुरेंद्र पालव यांनी केले.आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘सी’ पोस्टमन, ग्रुप ‘डी’च्या नाशिक विभागाच्या रौप्यमहोत्सवी संयुक्त द्विवार्षिक अधिवेशनास पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाशिक मुख्य टपाल कार्यालयात आयोजित अधिवेशनाप्रसंगी व्यासपीठावर सर्कल अध्यक्ष जगदीश पवार, नाशिक विभागाचे अध्यक्ष वसंत गांगुर्डे, रामभाऊ परघरमोल आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालव म्हणाले, ‘पोस्ट मास्तर केडर्स’ परीक्षा हे कर्मचाऱ्यांच्या एकतेच्या शक्तीचे विभाजन करण्याचा डाव असून, तरुण कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे. संघटनेकडून कामगारांच्या न्यायहक्कासाठी केली जाणारी आंदोलने अयशस्वी व्हावीत यासाठी ‘पोस्ट मास्तर केडर्स’ ही संकल्पना राबविली जात आहे हे कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावे. विभागातील टपाल कार्यालयांमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना कु ठल्याही प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागत असेल, तर त्यांनी विनासंकोच संघटनेकडे तक्रार करावी व आपल्या तक्रारीवर अखेरपर्यंत ठाम राहावे, असे आवाहनही पालव यांनी यावेळी केले.त्याचप्रमाणे संघटनेच्या स्थानिक कार्यकारिणीमधील अंतर्गत वाद हे सहजरीत्या मिटविता येणे शक्य असून, अधिवेशनात असे क्षुल्लक वादविवाद चव्हाट्यावर आणू नये, असा सल्लाही त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी विभागातील टपाल कर्मचारी व पोस्टमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)