शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कल्पना, संशोधनाला चालना मिळणे आवश्यक

By admin | Updated: August 13, 2016 00:02 IST

वासुदेव गाडे : विद्यापीठाच्या डिझाइन इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

 नाशिक : विद्यापीठातील संशोधनाचा थेट समाजाला फायदा व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पकता व नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अशा कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि औद्योगिकदृष्ट्या स्वयंनिर्भर करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे डिझाइन इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी के ले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कॉलेज आॅफ आर्किटेक्चर सेंटर फॉर डिझाइन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात डिझाइन इनोव्हेशन सेंटर उभारण्यात आले असून कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) या सेंटरचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठ व महाविद्यालय विकास संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, प्राचार्य प्राजक्ता बस्ते, समन्वयक सुवर्णा पाटील, दिलीप पाटील, नाना दळवी, नाना महाले, शिरीष कोतवाल, मुरलीधर पाटील आदि उपस्थित होते. कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाकडून उपकेंद्रासाठी प्राथमिक टप्प्यात दीड कोटींचे अर्थसाहाय्य मिळणार असून विद्यापीठामार्फत पर्यावरण व जल व्यवस्थापन, पीकवाढीच्या आधुनिक पद्धती, संगणकीय डिझाइन, इलेक्ट्रॉनिक सेन्सर, औषधनिर्मिती या विषयात डिझाइन इनोव्हेशन सेंटरमार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू केले जाणार आहेत. त्याचे स्वरूप आंतर विद्याशाखीय आहे. त्यामुळे विविध कारणांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉप आउट विद्यार्थ्यांना तांत्रिक व रोजगाराभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या सेंटरची मदत होणार असून विद्यार्थ्यांनी शहरासह ग्रामीण, आदिवासी भागातील नागरिकांना दैनंदिन वापरात उपयोगी पडतील अशा स्वरूपाची उपकरणांची रचना व निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी के ले. प्रास्ताविक उपकेंद्राच्या समन्वयक सुवर्णा पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)