नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर निमा स्टुडंट फोरमचा झेंडा फडकला असून, ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य निमा स्टुडंट फोरमचे सचिव डॉ. श्रीराम रगड, मुंबई विभाग प्रमुख डॉ. किरण देशमुख, सदस्य डॉ. सुजित पाटील, डॉ. अल्फेश नैनाव यांनी परिश्रम घेतले. निवडणूक आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अमोल धुर्वे, कृष्णा बोंडे, प्रमोद शेळके, दीपेश नाईक, मुरलीधर शिंदे, अनंतकुमार मखमले, विनय बुरडकर, पूनम कांबळे, तात्याराव बागलगवे यांचा समावेश आहे. निवडणूक यशस्वीतेसाठी डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. शैलेशकुमार निकम, डॉ. सतीश शिंदाडकर, डॉ. एल. जी. जाधव, डॉ. अनिल बाजारे, डॉ. संजय भक्कड यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
आरोग्य विज्ञान विद्यापीठावर निमा स्टुडंट फोरमचा झेंडा
By admin | Updated: February 4, 2017 23:02 IST