शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्षच

By admin | Updated: September 20, 2015 23:58 IST

कुटुंबीय पेचात : शेजारीही असंवेदनशील

नाशिक : दीड वर्षाच्या चिमुरडीचा दोनदा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तिडके कॉलनीतील कुटुंबीयांकडे सरकारवाडा पोलिसांनी साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे़ रविवारी पोलिसांनी या कुटुंबीयांची साधी चौकशीही केलेली नाही़ त्यातच ते राहात असलेल्या इमारतीतील शेजाऱ्यांनीही असंवेदनशीलता दाखवत घरमालकांकडे तक्रार केली आहे़तिडके कॉलनी परिसरातील दीड वर्षीय मुलीचे शुक्रवारी व शनिवारी असे सलग दोन दिवस अपहरणाचा प्रयत्न झाला़ सुदैवाने दोन्ही वेळेस मुलीचे वडील आल्याने अपहरणकर्त्यांनी पळ काढला़ तसेच या मुलीच्या आईला अपहरणकर्त्याच्या चाकूमुळे दुखापतही झाली़ याबाबत तक्रार करण्यास सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांच्याच उपदेशाचे डोस या मुलीच्या पालकांना पाजण्यात आले़ या प्रकारामुळे भयभीत झालेले कुटुंबीय नातेवाइकांकडे आसरा घेण्यासाठी गेले़तिडके कॉलनी परिसरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर राहणारे हे कुटुंबीय रविवारी घरी परतले़ त्यावेळी या इमारतीतील सदस्यांनी सोसायटीची मिटिंग लावून या कुटुंबीयांना तसेच भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या मालकास बोलावून यांना इथे ठेवू नका, यांच्यामुळे समस्या निर्माण होते, असे सुनावले़ मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पोलिसांचे असहकार्य त्यात सोसायटीतील शेजाऱ्यांची असंवेदनशीलता यामुळे हे कुटुंबीय पेचात सापडले आहे़ या कुटुंबातील महिलेचा भाऊ पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक असून, त्यांच्या कानावरही ही बाब घालण्यात आली आहे़ तसेच सोमवारी (दि़२१) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे माहिती कुटुंबातील महिलेने दिली आहे़ (प्रतिनिधी)