शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

By admin | Updated: April 6, 2017 01:56 IST

नाशिक : वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात.

 नाशिक : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या कॉलेजरोड आणि गंगापूररोडवरील वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली किंवा एखादा गंभीर अपघात घडला की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात. परंतु येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची गरज आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांसारख्या यंत्रणा या कितपत गांभीर्याने घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कॉलेजरोड आणि गंगापूररोड हा उच्चभ्रू परिसर मानला गेला असला तरी येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या वाहतूक समस्यांना तोंड द्यावे लागते. या मार्गावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमुळे भरधाव दुचाकी चालविणारे बाइकर्स तसेच कसरती करणारे स्टंट मॅन यामुळे येथे चालणे तसे धोकादायकच असते. आपण कितीही नियमानुसार वाहन चालवा, परंतु आपल्या पाठीमागून किंवा समोरून येणारे नियमांचे पालन करीत येईल याची खात्री नसते त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचे अनेक अपघात झाल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून त्यावर उपाय करण्याचे दाखविण्यासाठी कधीतरी दुचाकी अडविण्यासारखे प्रकार घडतात. परंतु एक- दोन दिवसांच्या अशा कारवाईने तात्पुरती मलमपट्टी होते. गेल्यावर्षी अशाच प्रकारे एका प्राध्यापकाला अपघातामुळे जीव गमवावा लागल्यानंतर महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वाहतुकीच्या बेशिस्तीविरोधात संयमाने पुढे सरकले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही.या मार्गांवर वाहनांसाठी पुरेशी जागा न सोडता बांधलेल्या इमारती आणि व्यापारी संकुले ही समस्या आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हीदेखील वाहतुकीला अडथळा ठरतात. फळविक्रेते, अंडारोल, पाणीपुरी यांसह अनेक विक्रेत्यांची अतिक्रमणे थाटली असून, ती हटविण्याची मात्र कोणतीही कारवाई महापालिका करीत नाही. गंगापूररोडवर किमान रस्ता रुंद आहेत. कॉलेजरोडवर मात्र तशी सोय नाही. दुभाजकांमुळे अगोदरच रस्ते अरुंद आहेत त्यातच दुतर्फा रस्ता रुंदीकरणाची सोय नाही. उलट दोन्ही बाजूच्या दुकाने, शोरूमचे वाहनतळ म्हणजे रस्तेच ठरले आहेत. विशेष म्हणजे अनेक शोरूमचे संचालक कॉलेजरोडच्या शोरूमसमोर प्रशस्त वाहनतळ अशी प्रसिद्धी करीत असतात. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई करणे हा उपाय नाही तर अशा इमारतींची वाहनतळे शोधून तेथे वाहने कशी उभी राहतील, याबाबत ठोस उपाययोजना झाली पाहिजे. दुकानांसमोरील दुकानदारांचीच अतिक्रमणे हटविण्याचे धाडस दाखवले पाहिजे. प्रसंगी वाहतूक मार्गातील बदलापासून अनेक उपाय करता येण्यासारखे आहेत, ते लोकांना विश्वासात घेऊन केले तर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. (प्रतिनिधी)(समाप्त)