पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : तीन दिवसांपासून पडलेल्या पावसाने जुने नाशिक परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. परिसरात अनेक रिकामे वाडे, पडक्या इमारतीत पाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे.
दुभाजकांमधील गवत काढावे
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवत वाढल्याने अनेक दुभाजकांमधून पलीकडील वाहन दिसत नाही. त्यामुळे दुभाजकातून दुसऱ्या रस्त्यावर जाणारी वाहने अनेकदा दुभाजकावर आदळून अपघात घडत आहेत. त्यामुळे दुभाजकांमधील वाढलेले गवत त्वरित काढण्याची मागणी होत आहे.
नातेवाईकांची धावपळ सुरूच
नाशिक : कोरोना रुग्ण काही प्रमाणात कमी झाले असले तरी, अद्यापही औषधे, इंजेक्शन्स किंवा अन्य वैद्यकीय कारणास्तव रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची दैना उडत आहे. अशा परिस्थितीत अन्य कुणीही मदतीलादेखील पुढे येत नसल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनाच धावपळ करावी लागत आहे.