शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लोकहिताचे निर्णय घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:41 IST

नाशिक : सरकारने लोकप्रिय विधाने करू नये. जनतेला सक्षम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पूरक असलेले लोकहित साधणारे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था बळकट करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारने लोकप्रिय विधाने करू नये. जनतेला सक्षम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पूरक असलेले लोकहित साधणारे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था बळकट करावी, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी व्यक्त केले.आयएमएच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘जेरिकॉन-२०१७’ परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि.२२) करण्यात आले याप्रसंगी वानखेडकर बोलत होते. व्यासपीठावर राज्याध्यक्ष डॉ. अशोक तांबे, शहराध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. किशोर भंडारी, डॉ. किरण शिंदे, डॉ. आवेश पलोड, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. राजश्री पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वानखेडकर यांनी वैद्यकीय क्षेत्राबाबत सरकारकडून आखल्या जाणाऱ्या विविध धोरणांवर टीका केली, तसेच आरोग्यसेवेवर शेजारील गरीब राष्ट्रांपेक्षाही कमी खर्च भारताकडून होत असल्याची खंतही व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, सरकारने राज्य वैद्यक परिषद समितीच्या निवडणुका होऊन दहा महिने लोटले तरी अद्याप समिती गठित केली नाही हे दुर्दैव; मात्र सरकारला हे गरजेचे वाटत नाही तर लोकप्रिय विधाने करून वैद्यकशास्त्राच्या बाबतीत जनतेचा रोष कसा वाढेल, यामध्ये जास्त रस वाटतो असा आरोप वानखेडकर यांनी यावेळी केला. सरकारने धोरण ठरविताना दुटप्पीपणा थांबवावा, असे यावेळी आवाहन केले. या परिषदेसाठी राज्यभरातून सुमारे दीड हजाराहून अधिक डॉक्टर दाखल झाले आहे. आरोग्य विषयक विविध विषयांवर चर्चासत्रे पार पडणार आहेत.क्रॉसपॅथीला विरोध कायम‘आयएमए’ने नेहमीच क्रॉसपॅथीला विरोध दर्शविला आहे. राज्याची ९० टक्के आरोग्यसेवा खासगी असून, केवळ १० टक्के सरकारी आहे. डॉक्टरांची शासनाने भरती करावी आणि राज्याची आरोग्यसेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसारच डॉक्टरांनी रुग्णांना आरोग्यसेवा पुरवावी, असे आवाहन राज्याध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी केले.