शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘लग्नातील प्रथा बंद करण्याची गरज’

By admin | Updated: June 6, 2016 00:02 IST

वंजारी बहुद्देशीय संस्था : वधू-वर सूचक मेळावा

 नायगाव : सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. लग्न समारंभातील खर्चिक प्रथांना विरोध करून त्यांना पायबंद घालण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक बुधाजी पानसरे यांनी व्यक्त केले. वंजारी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वधू-वर सूचक मेळाव्या दरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे जिल्हा अध्यक्ष हिरामण पानसरे, उपाध्यक्ष देवराम गिते, विठ्ठल नागरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिवसेंदिवस विवाह सोहळे खर्चिक बनत चालले आहेत. महागाईचा विचार करता समाजाने यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे पानसरे यांनी आवाहन केले. सध्याच्या विवाह सोहळ्यांमध्ये हळदी समारंभ भव्य करण्याची परंपरा सुरू झाली़ असून यात खर्च होतो. या प्रथा सर्वांनाच परवडणाऱ्या नसल्याने लग्नाच्या खर्चाने संपूर्ण कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली वावरत असल्याचे पानसरे यांनी यावेळी सांगितले. नायगावच्या पोलीसपाटीलपदी निवड झालेल्या ज्योत्स्ना पानसरे यांचा वंजारी सेवा संस्थेच्या संघटक चंद्रकला साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)