शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बोलबाला

By admin | Updated: February 24, 2017 00:56 IST

निवडणूक : चार पैकी तीन गट व आठ पैकी पाच गणांवर विजय

नाशिक : तालुक्यातील चार गट व आठ गणांच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वाधिक तीन गट व पाच गणांवर विजय मिळवित पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर सुरुवातीला गोवर्धन व गिरणारे गट व गणाची व नंतर पळसे व एकलहरे गट व गणाची मजमोजणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत १२ टेबलांवर प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांनी मतमोजणी करण्यात आली. गिरणारे गटातून राष्ट्रवादीच्या अपर्णा खोसकर यांना १० हजार ३४१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी कॉँग्रेसच्या मंजुळाबाई गायकवाड यांना ४६७८ मते मिळून अपर्णा खोेसकर पाच हजार ६६३ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेच्या रोहिणी गायकवाड यांना २८०३, तर भाजपाच्या चंद्रभागा बेंडकोळी यांना २९३४ मते मिळाली. पळसे गटातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगन आगळे पराभूत झाले. त्यांंना राष्ट्रवादीच्या यशवंत ढिकले यांनी पराभूत केले. पळसे गटात शिवसेनेचे जगन आगळे यांना ६३६२, राष्ट्रवादीचे यशवंत ढिकले यांना ७४४६, अपक्ष संजय तुंगार यांना ६२४४ मते मिळाली. येथून यशवंत ढिकले १०८४ मतांनी विजयी झाले. एकलहरे गटाचा सर्वात धक्कादायक निकाल राहिला. खासदार पुत्र अजिंक्य हेमंत गोडसे यांना ८४६९, सेना बंडखोर अपक्ष शंकर धनवटे यांना दहा हजार ५६०, तर कॉँग्रेसचे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांना ४०४१ तर भाजपाचे ज्ञानेश्वर पाळदे यांना १५४३ मते मिळाले. येथून अपक्ष शंकर धनवटे २०९१ मतांनी विजयी झाले. गोवर्धन गटातून शिवसेनेचे भाऊसाहेब झोबांड यांना ५४१०, राष्ट्रवादीचे माजी सभापती हिरामण खोसकर यांना ९५५६, भाजपाचे संपत बोेंबले यांना २३६७, कॉँग्रेसचे उत्तम ठमके यांना १९४९, तर माकपाचे तानाजी जावळे यांना १९३१ मते मिळाली. गोवर्धन गटातून हिरामण खोसकर ४१४६ मतांनी विजयी झाले. (प्रतिनिधी)गणातही राष्ट्रवादीचीच बाजीतालुक्याच्या आठ पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक पाच जागा जिंकून राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापतिपदावर दावा सांगितला आहे. गिरणारे गणातून उमेदवारनिहाय मते पुढीलप्रमाणे- ज्योती डंबाळे- शिवसेना- २३७१, छाया डंबाळे- ४१७४ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) मीरा गोलवड- २९१३ (कॉँग्रेस), हिरा दोबाडे- ११९५ (अपक्ष) अशी मते मिळाली. येथून राष्ट्रवादीच्या छाया डंबाळे विजयी झाल्या. देवरगाव गण- नंदा मोंढे- ११२६ (शिवसेना), कविता बेंडकोळी- ३०९१ (राष्ट्रवादी), सत्यभामा बदादे- १७४१ (कॉँग्रेस), शांताबाई मोंढे- १४६२ (अपक्ष), ढवळाबाई दोबाडे- ८४२ (मनसे), सीताबाई गभाले- १९३९ (अपक्ष) अशी मते मिळून येथून राष्ट्रवादीच्या कविता बेंडकोळी विजयी झाल्या. पळसे गण- उज्ज्वला जाधव- ३५९३ (शिवसेना), माधुरी गायधनी- १६११ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मंगला जगळे- १६१७ (भाजपा), आशाबाई धात्रक- १०६७ (मनसे), अलका धायधनी- ३३०५ (अपक्ष) अशी मते मिळून शिवसेनेच्या उज्ज्वला जाधव निवडून आल्या आहेत. सिद्धपिंप्री गण- सिंधूबाई ढिकले- २८७२ (शिवसेना), विजय कांडेकर- ४१५८ (राष्ट्रवादी), दुर्गा बोराडे- १५१६ (भाजपा), पूनम कदम- ७३१ (अपक्ष), पुष्पा ढिकले- २४०६ (अपक्ष) अशी मते पडून राष्ट्रवादीच्या विजया कांडेकर निवडून आल्या. एकलहरे गण- सचिन जगताप- ३१७९ (शिवसेना), बाळकृष्ण म्हस्के- २९४१ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), चंद्रभान घुगे- १३४८ (भाजपा), विजय जगताप- ३३७४ (अपक्ष) अशी मते मिळून अपक्ष विजय जगताप येथून निवडून आले. लहवित गण- डॉ. मंगेश सोनवणे- ५३९६ (शिवसेना), विनोद जगताप- १४३८ (भाजपा), अविनाश गायकवाड- २२१० ( कॉँग्रेस), अंबादास गवारे- २०४ (भाकप), अरुण जाधव- १०२ (अपक्ष), ज्योती मोरे- ३७८९ (अपक्ष) अशी मते मिळून येथून शिवसेनेचे डॉ. मंगेश सोनवणे विजयी झाले. गोवर्धन गण- देवीदास जाधव- २०९४ (शिवसेना), ढवळू फसाळे- २८१२ (राष्ट्रवादी), बाळू बेंडकोळी- ९७२ (भाजपा), दत्ताराम बेंडकुळे- २१५१ (कॉँग्रेस), मंगेश डगळे- ६८८ (भाकप), रवींद्र मेढे- ४६३ (अपक्ष) अशी मते मिळून येथून राष्ट्रवादीचे ढवळू फसाळे निवडून आले. विल्होळी गण- तुकाराम दाते- ३१७२ (शिवसेना), रत्नाकर चुंबळे- ६५४९ (राष्ट्रवादी), अ‍ॅड. अरुण खांडबहाले- २१५७ (भाजपा) अशी मते मिळून जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचे पती रत्नाकर चुंबळे विजयी झाले.