शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

प्रचार-प्रसिद्धीत कॉँग्रेसची राष्ट्रवादीवर ‘आघाडी’

By admin | Updated: August 15, 2014 00:34 IST

प्रचार-प्रसिद्धीत कॉँग्रेसची राष्ट्रवादीवर ‘आघाडी’

नाशिक : राज्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारचा पंधरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या निमित्ताने व आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या जनसंपर्क विभागाने ‘नेतृत्वाचे सर्वसमावेशक निर्णय’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली असून, राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला सुमारे हजार पुस्तिका स्थानिक ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी पाठविल्या आहेत.या पुस्तिकेत राज्यातील आघाडी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची जंत्रीच रकमेसह दिली आहे. ५६ पानांच्या रंगीत पुस्तिकेत समतोल औद्योगिक विकास, कृषिविकास, गतिमान प्रशासन, राज्यातील नागरी ‘ई-गव्हर्नन्स’ प्रकल्प, बदलती शहरे, सर्वसमावेशक विकास, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात, शिक्षणाच्या नव्या दिशा, आरोग्यसंपदा, संवर्धन पर्यावरण आणि संस्कृतीचे आदि टप्पे दर्शविण्यात आले आहे. या टप्प्यांद्वारे राज्यातील विकासाचा आलेखच सादर करण्यात आला आहे. मुखपृष्ठाच्या आतील पानात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दोन महत्त्वाची छायाचित्रे असून, एका छायाचित्रात स्वित्झर्लंड येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला जाताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी झ्युरिक विमानतळ कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर केलेली चर्चा व दुसऱ्या छायाचित्रात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्या भेटीचे छायाचित्र आहे.त्याचबरोबर सदर माहिती पुस्तिकेत गारपीटग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त भागांसाठी बांधण्या आलेले सीमेंट बंधारे, शेततळे यांच्यासह विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली असून, राज्यातील जिल्हा परिषदांना सुमारे हजार पुस्तिकांचे वाटप करण्यात आले असून, जिल्हा परिषद स्तरावरून या पुस्तिका ग्रामपंचायतींना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)