शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-भाजपाचा विषय समित्यांवर कब्जा

By admin | Updated: April 6, 2017 02:27 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन तासांच्या अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी व भाजपाने चार समित्यांवर कब्जा मिळविला

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन तासांच्या अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी व भाजपाने चार समित्यांवर कब्जा मिळविला. शिवसेना व कॉँग्रेसने सभात्याग केल्याने ३९ विरुद्ध ० मतांनी भाजपा-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यात समाजकल्याण समिती सभापतिपदी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्य सुनीता रामदास चारोस्कर यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादीकडून महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी अपर्णा वामन खोसकर व विषय समिती सभापतिपदी यतीन पगार यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या कोट्यातून मनीषा रत्नाकर पवार यांची विषय समिती सभापतिपदी निवड करण्यात आली.शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांनी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्यांना व्हीप बजावण्याच्या कारणावरून सभागृहात दोन तास गोेंधळ घातला. कॉँग्रेसच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दोन तास संयमी भूमिका घेत दुपारी साडेचार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. भाजपा व राष्ट्रवादीकडून सदस्य सिद्धार्थ वनारसे व डॉ. प्रदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेले. तर शिवसेना-कॉँग्रेसकडून बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित, दीपक शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज नेले. दुपारी एक वाजता सभागृहात भाजपा-राष्ट्रवादीचे ३५ सदस्य तसेच कॉँग्रेसचे बंडखोर सुनीता चारोस्कर, अशोक टोेंगारे, शोभा कडाळे यांच्यासह अपक्ष रूपांजली माळेकर असे ३९ सदस्य एका बाजूला बसले. महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपा-राष्ट्रवादीकडून अर्पणा खोसकर तर शिवसेना-कॉँग्रेसकडून अश्विनीकुमार अहेर यांनी उमेदवारी अर्ज भरले. समाजकल्याण समितीसाठी कॉँग्रेस बंडखोर सुनीता रामदास चारोस्कर यांनी, तर शिवसेना-कॉँग्रेसकडून माकपा बंडखोर अनिता गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज भरले. अन्य दोन विषय समिती सभापतिपदासाठी आघाडीकडून मनीषा रत्नाकर पवार व यतीन पगार यांनी, तर युतीकडून शंकर धनवटे व धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघारीच्या मुदतीत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व गटनेते यशवंत गवळी यांनी कॉँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाची व्हीप बजावण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्हीप बजावण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. दोन तासांच्या गोंधळानंतर सेना-कॉँगे्रसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेस बंडखोर उमेदवारांचा विजय निश्चित झाला. (प्रतिनिधी)

शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांनी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्यांना व्हीप बजावण्याच्या कारणावरून सभागृहात दोन तास गोेंधळ घातला. कॉँग्रेसच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दोन तास संयमी भूमिका घेत दुपारी साडेचार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. भाजपा व राष्ट्रवादीकडून सदस्य सिद्धार्थ वनारसे व डॉ. प्रदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेले. तर शिवसेना-कॉँग्रेसकडून बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित, दीपक शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज नेले. दुपारी १ वाजता सभागृहात भाजपा-राष्ट्रवादीचे ३५ सदस्य तसेच कॉँग्रेसचे बंडखोर सुनीता चारोस्कर, अशोक टोेंगारे, शोभा कडाळे यांच्यासह अपक्ष रूपांजली माळेकर असे ३९ सदस्य एका बाजूला बसले. महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपा-राष्ट्रवादीकडून अर्पणा खोसकर तर शिवसेना-कॉँग्रेसकडून अश्विनीकुमार अहेर यांनी उमेदवारी अर्ज भरले. समाजकल्याण समितीसाठी कॉँग्रेस बंडखोर सुनीता रामदास चारोस्कर यांनी, तर शिवसेना-कॉँग्रेसकडून माकपा बंडखोर अनिता गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज भरले. अन्य दोन विषय समिती सभापतिपदासाठी आघाडीकडून मनीषा रत्नाकर पवार व यतीन पगार यांनी, तर युतीकडून शंकर धनवटे व धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघारीच्या मुदतीत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व गटनेते यशवंत गवळी यांनी कॉँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाची व्हीप बजावण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्हीप बजावण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. दोन तासांच्या गोंधळानंतर सेना-कॉँगे्रसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेस बंडखोर उमेदवारांचा विजय निश्चित झाला. (प्रतिनिधी)