शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नाईक शिक्षण संस्थेच्या सभासदांनी घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:39 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या जागेवरील वसंत मार्केटचे बांधकाम विकासक श्यामराव केदार यांच्याकडे फक्त इमारत वापराचे हक्क असताना त्यांनी टेरेसवर अतिक्र मण केल्याचा आरोप करीत संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेत याविरोधात ठराव करून थेट वसंत मार्केटच्या गच्चीवर हल्लाबोल करून गच्चीचा ताबा घेतला. यावेळी आक्रमक झालेल्या सभासदांनी गेटला लावलेले टाळे तोडून गच्चीवर प्रवेश केला व वसंतराव नाईक यांचा जयजयकार करून घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देनाईक शिक्षण संस्थेच्या सभासदांनी घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबासर्वसाधारण बैठकीत गोंधळ : आक्रमक सदस्यांनी कुलूप तोडून केला प्रवेश

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या जागेवरील वसंत मार्केटचे बांधकाम विकासक श्यामराव केदार यांच्याकडे फक्त इमारत वापराचे हक्क असताना त्यांनी टेरेसवर अतिक्र मण केल्याचा आरोप करीत संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेत याविरोधात ठराव करून थेट वसंत मार्केटच्या गच्चीवर हल्लाबोल करून गच्चीचा ताबा घेतला. यावेळी आक्रमक झालेल्या सभासदांनी गेटला लावलेले टाळे तोडून गच्चीवर प्रवेश केला व वसंतराव नाईक यांचा जयजयकार करून घोषणाबाजी केली. सभासदांनी संपूर्ण टेरेसचा प्राथमिक ताबा मिळवतानाच पुढील कायदेशीर पूर्तता करून केदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठरावही सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. क्र ांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२४) संस्थेच्या प्रांगणात पार पडली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, आमदार बाळासाहेब सानप, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस अ‍ॅड. तानाजी जायभावे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, संचालक आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी मानोरी व मखमलाबाद जमीन खरेदी प्रकरण आणि वसंत मार्के टच्या गच्चीविषयी खुलाशाची मागणी केली. येथे संस्थेने किशोर सूर्यवंशी ट्रस्टकडून १० एकर जागा खरेदी केली असून, यापैकी ३ एकर जागेचा ताबा अद्यापही संस्थेने घेतलेला नाही. व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत ट्रस्टी बदलले असून, त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट सादर केलेला नाही. त्यामुळे संस्थेला अद्याप ताबा मिळाला नाही. पुढील काळात या जागेचा ताबा मिळणार नसल्यास किशोर सूर्यवंशी यांच्या खासगी मालकीची जागा घेण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. तसेच कॅनडा कॉर्नर परिसरातील जागेवर वसंत मार्केटची इमारत उभारण्यासाठी विकासक श्यामराव केदार अ‍ॅण्ड असोसिएशन यांना एफएसआय वापराचे हक्क आहेत. मात्र, त्यांनी तीन मजली इमारतीवरील गच्चीवर मोबाइल टॉवर, जिम व पाळीव कुत्र्यांच्या साहित्यासाठी भाडेतत्त्वावर व्यावसायिक वापर सुरू केल्याचा आरोप सभासदांनी केला. टेरेसचा अधिकार संस्थेकडे असताना केदार यांनी बेकायदेशीरपणे अतिक्र मण केल्याचे सांगत संबंधित अतिक्रमण उखडून टाकण्याचा ठराव सभासदांनी केला. तसेच सर्वसाधारण सभा पार पडताच संस्थेच्या पदाधिकाºयांसह सभासदांनी वसंत मार्केटच्या टेरेसवर धाव घेतली. टेरेसच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून सभासदांनी वसंतराव नाईक यांच्या नावाने जयघोष करीत टेरेसवर प्राथमिक ताबा मिळवला. दरम्यान, सर्वसाधारण सभेत माजी सरचिटणीस पी. आर. गिते, मनोज बुरकुले, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब सांगळे यांनी विविध विषय मांडले. प्रास्ताविकात सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी संस्थेची ध्येय व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली....या विषयांना मंजुरीसर्वसाधारण सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताला मजुरी देतानाच २०१६-१७ च्या अहवालाचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे २०१६-१७च्या आर्थिक पत्रांना मंजुरी देण्यासोबतच २०१७-१८ च्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली. सिन्नर येथील लाड वंजारी ज्ञाती धर्म फंड संस्थेची १३.५ एकर जमीन संस्थेस वर्ग करण्यासोबतच नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करणे, संस्थेसाठी लेखा परीक्षकांची नियुक्ती करणे आदी विषयांवरही चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.निमंत्रित सभासदाचा प्रस्ताव फेटाळलानायगाव गोदा युनियन धर्मादाय संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा केव्हीएन संस्थेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. यावेळी गोदा युनियनचे प्रतिनिधी लक्ष्मण सांगळे यांनी परिसरातून एक निमंत्रित संचालकाचा संचालक मंडळात समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.