शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत

By admin | Updated: June 27, 2016 00:28 IST

नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत

 नायगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आठवडाभरापासून बंद असलेली नायगावसह नऊ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सोमवारपासून पूर्ववत झाली आहे. गुरुवार व रविवार हे दोन दिवस योजनेत सहभागी गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.जलसंपदा विभागाच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेला आठवडाभरापूर्वी सील लावण्यात आले होते. ऐन पाणीटंचाईच्या काळातच योजना बंद करण्यात आल्याने नायगाव खोऱ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. अचानक योजना बंद होण्याच्या प्रकारामुळे याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. चेहडी येथे दारणा नदीपात्रातून उचललेले पाणी मोहदरीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून मोह, मोहदरी, वडझिरे, जायगाव व देशवंडी या योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरलेल्या या योजनेकडे जीवन प्राधिकरणसह समिती पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून योजना डळमळीत झाली आहे. पाणीपुरवठ्याबाबत अनियमितता दिसून येत असल्याने योजनेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या काळातच योजना संकटात सापडल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. सोमवारपासून योजना पूर्ववत झाली असून, गुरुवार व रविवार हे दोन दिवस योजनेत सहभागी गावांना पाणीपुरवठा केला जाणार असल्यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने योजना अडचणीत आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन संबंधित विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)