शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

गार्गी जोशीला राष्ट्रीय विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST

सातपूर : इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स ...

सातपूर : इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

भारतातील सर्व आघाडीचे मेमरी ॲथलिट या स्पर्धेत सहभागी झाले असताना, अवघ्या १२ वर्षांच्या गार्गीने आपल्या स्मरणशक्तीचे कसब दाखवत नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेत देशातील सर्व आघाडीचे, नावाजलेले आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मेमरी ॲथलिट सहभागी होतात. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेतल्यामुळे स्मरणशक्तीबरोबरच तंत्रज्ञानाचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. अवघ्या १२ वर्षांच्या गार्गीने हे आव्हान लिलया पेलत तिच्या वयोगटात स्पर्धेचे विजेतेपद तर मिळवलेच पण ओपन रँकिंगमध्येही पाचवे मानांकन मिळवत आपल्या प्रतिभेची चुणुक दाखवली आहे. गार्गीने यापूर्वी तुर्कस्थान येथे आयोजित ‘मेमोरियाड ओपन मेमरी चॅम्पियनशिप २०१८’ या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत एक सुवर्ण, दोन रजत आणि एका कांस्यपदकाची कमाई अवघ्या नवव्या वर्षी केली होती. गार्गी ही नाशिकमधील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. सत्तेन जोशी यांची कन्या आहे. (फोटो १२ गार्गी)