शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष निवडणुकीसाठी राष्टÑवादी-सेना सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:34 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी भावना राष्टÑवादीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी एकत्र : सोमवारनंतर जागावाटप

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी भावना राष्टÑवादीच्या काही सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पुढच्या आठवड्यात कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक दि. २ जानेवारी रोजी होण्याचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांची राष्टÑवादी भवन येथे बैठक बोलावून पक्षाचे बलाबल जाणून घेतले त्याचबरोबर पोट निवडणुकीत दोन अपक्ष निवडून आल्याने त्यांची भूमिका काय असेल त्याची चाचपणी केली. नुकतेच निवडून आलेले खेडगाव गटातील भास्कर भगरे हे या बैठकीस उपस्थित होते, मात्र गीतांजली पवार या बैठकीत आल्या नाहीत. यावेळी भुजबळ यांनी सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. पदाधिकाऱ्यांची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असून, कोण कोण इच्छुक आहेत. याची माहितीही घेतली. त्यावेळी अनेक सदस्यांनी पक्ष घेईल त्या निर्णयाला बांधिल राहू, असे सांगितले. तर काहींनी महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आता राष्टÑवादीला मिळावे, अशी मागणी केली. शिवसेनेने पावणेतीन वर्षे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवले होते, उर्वरित काळ राष्टÑवादीला द्यावा, अशी भावनाही बोलून दाखविली. पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या संदर्भात लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.भुजबळ, राऊत घेणार अंतिम निर्णयशिवसेनेच्या सदस्यांची बैठक संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतली. त्यातही पक्षाची सदस्य संख्या, सध्या कोणत्या पक्षाकडे सभापतिपद आहे याची माहिती त्यांनी घेतली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. सोमवारनंतर छगन भुजबळ व संजय राऊत हे एकत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील व तो सर्वांना मान्य करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPoliticsराजकारण