पेठ : चाचडगावनजीक समोरून येणाऱ्या लक्झरी बसने हुलकावणी दिल्याने ट्रक उलटल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला फेकला गेला. समोरील फरशीच्या कठड्यावर आदळल्याने पलटी झाला. चालक व क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरीही गाडीतील कापडाच्या गाठी चिखलात पडल्याने मोठे नुकसान झाले.
नाशिक-पेठ रस्त्यावर ट्रक उलटला
By admin | Updated: September 3, 2014 00:36 IST