शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ओझरच्या महिलेची फसवणूक करणाºया नायजेरीयनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 16:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ओझर येथील महिलेची सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºया नायजेरीयन नागरिकास ग्रेटर नोयडा व महाराष्ट्र पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमवारी (दि़२४) रात्री अटक केली आहे़ किंग्जले चिबूकेम (३२,रा़लंडन मूळ रा़नायजेरीया) असे या संशयिताचे नाव असून त्याच्यावर ओझर पोलीस ठाण्यात फसवणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ओझर येथील महिलेची सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक करणाºया नायजेरीयन नागरिकास ग्रेटर नोयडा व महाराष्ट्र पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून सोमवारी (दि़२४) रात्री अटक केली आहे़ किंग्जले चिबूकेम (३२,रा़लंडन मूळ रा़नायजेरीया) असे या संशयिताचे नाव असून त्याच्यावर ओझर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविता फकिरा पाटील (३२, यमुनानगर, ओझर) यांचे ब्युटी पार्लर असून त्यांनी पुर्नविवाहासाठी शादीक़ॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती़ संशयित मिचेल सोसन क्रेग (३२,रा़नायजेरीया) या बनावट नावाच्या व्यक्तीने पाटील यांच्याशी संपर्क साधून मी लंडन येथील रहिवासी असून एका प्रतिष्ठित कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले़ तसेच मी गिफ्ट पाठविले असून ते सोडवून घेण्यास सांगितले़क्रेगवर विश्वास ठेवलेल्या पाटील यांना ९ जुलै रोजी श्वेता नावाच्या मुलीने फोन केला व मी दिल्ली येथील डेल्टा कुरिअर सर्व्हिसची कर्मचारी असल्याचे सांगून पार्सल सोडविण्यासाठी ४२ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले़ पाटील यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दिल्ली एअरपोर्टच्या स्कॅनिंग विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या पार्सलमध्ये पैसे असल्याने तुम्हाला दंड तसेच पार्सलसाठी सोडविण्यासाठी १ लाख २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले़पाटील यांनी दोन वेळा १ लाख लाख ६७ हजार ५०० रुपये संबंधितांच्या बॅक खात्यावर भरूनही पार्सल न मिळाल्याने त्यांना संशय आला व त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद दिली़ या प्रकरणी ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला़ या तपासात पाटील यांनी बॅकेत भरलेले अकाँटमधील पैसे संबंधित व्यक्तीने दिल्ली येथील एका एटीएममधून काढल्याचे समोर आले़ ग्रेटर नोएडा पोलीस व ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून संशयितास सोमवारी अटक केली़पोलिसांनी अटक केलेल्या मिचेल सोसन क्रेग याचे हे बनावट नाव असून खरे नाव किंग्जले चिबूकेम असल्याचे तपासात समोर आले आहे़दरम्यान, संशयित चिबूकेम यास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पंकज भालेराव यांनी ताब्यात घेतले असून ते नाशिकला येत आहेत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे़