शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘भिलार’ला पोहोचली नाशिकची बोलकी पुस्तके

By admin | Updated: May 8, 2017 15:42 IST

पुस्तकांच्या गावाला भेट : नॅब मोडक सेंटर-कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकनेही खारीचा वाटा उचलला असून, दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच ‘भिलार’च्या वाचकांना उपलब्ध झाला आहे. त्यासाठी नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ज्या वाचकांची दृष्टी अधू झालेली आहे, वयोमानानुसार वाचन करणे अवघड बनले आहे किंवा ज्यांनी शाळेत जाऊन कधीही मुळाक्षरे गिरविली नाहीत अशा अनपढ वाचकांसाठी ही बोलकी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाने देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. पुस्तकांच्या गावाला पुस्तके तर लाखोने जातील, परंतु वाचनचळवळ सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर यांनी अंध मुलांसाठी तयार केलेली बोलकी पुस्तके भिलारला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य मराठी संस्थेच्याच सहाय्याने दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच भिलारला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ७५ मराठी व इतर हिंदी-इंग्रजी भाषेतील आहेत. भिलार गावातील अनेक ज्येष्ठ, वयोवृद्धांना पुस्तकांचे वाचन करणे शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही किंवा ज्यांनी कधीही शाळा शिकलेली नाही अशा लोकांना ही बोलकी पुस्तके शांतपणे बसून ऐकता येणार आहेत. आॅडिओ सीडीजच्या स्वरूपात तयार केलेली ही पुस्तके गावातील अंध वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहेत. या बोलक्या पुस्तकांमध्ये पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रजांपासून अनेक नामवंत लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात भविष्यात आणखी भर घातली जाणार आहे.