शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे उद्योग क्षेत्र भरारीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनानंतरच्या काळामध्ये नाशिकमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी असून, लवकरच नाशिकच्या उद्योग जगताचे विमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनानंतरच्या काळामध्ये नाशिकमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीला मोठी संधी असून, लवकरच नाशिकच्या उद्योग जगताचे विमान आकाशात भराऱ्या मारताना दिसू शकेल, असा विश्वास विविध उद्योजकांनी व्यक्त केला. नाशिक ‘लोकमत’च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी हे मतप्रदर्शन केले.

या चर्चेमध्ये नाशिक आयटी असोसिएशनचे अध्यक्ष आणि डब्ल्यूएनएसचे महाव्यवस्थापक अरविंद कुलकर्णी, निपमचे अध्यक्ष श्रीधर व्यवहारे, सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक देवाशिष चक्रवर्ती, प्रथमेश एंटरप्रायजेसचे संचालक विजय दीक्षित, ग्राहक मंचाचे सुधीर काटकर हे सहभागी झाले होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी या सर्वांचे स्वागत करून संवाद साधला.

कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला असला तरी त्यामधूनच नाशिकसारख्या दुसऱ्या श्रेणीतील शहराला वाढीच्या अनेक संधी प्राप्त होण्याची संधीही मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. मुंबई आणि पुणे या महानगरांमधील गर्दीमुळे आता अनेकांचा कल नाशिककडे असल्याचे सांगण्यात आले. शहराचे असलेले मर्यादित स्वरूप, चांगल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची उपलब्ध होत असलेल्या सुविधा यामुळे नाशिकला चांगली पसंती मिळत आहे. नाशिकमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे लवकरच नाशिकचे उद्योग क्षेत्र भरारी मारताना दिसून येण्याची शक्यता या मान्यवरांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नसला तरी या क्षेत्रासाठी आगामी काळ हे सुवर्णयुग राहण्याची अपेक्षा आहे. येथील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी त्यामुळे उपलब्ध होऊ शकतील, असेही सांगण्यात आले. कोरोनाकाळामध्ये नाशिकच्या बाहेर जाऊन नोकऱ्या करणारे अनेक जण आपल्या घरी परत आले असून, आता येथेच कायम राहण्याची त्यांची मानसिकता असल्याने नाशिकमध्ये चांगले मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याचेही मत वर्तविले गेले.

इन्फो

प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार

नाशिकजवळच एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जात असून, त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना जर्मनी सरकारचे

प्रमाणपत्र मिळणार असल्याने येथील प्रशिक्षणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार असल्याची माहिती सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक देवाशिष चक्रवर्ती यांनी दिली. या केंद्रामध्ये जे प्रशिक्षण देणार आहेत, त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. लवकरच हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यावर येथील प्रशिक्षित तरुणांना चांगल्या संधी सर्वत्रच उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इन्फो

शैक्षणिक सुविधांकडे पुरवावे लक्ष

भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योग आल्यानंतर पुण्यामध्ये तो चांगला बहरला, याचे कारण तेथे उपलब्ध असलेल्या चांगल्या शैक्षणिक सुविधा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नाशिकच्या परिसरामध्ये असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांनी आपल्याकडील अभ्यासक्रम हे विविधांगी करतानाच त्यामधून उत्तम विद्यार्थी कसे घडतील, याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. असे झाल्यास आगामी काळामध्ये नाशिककडे अनेक उद्योग आपणहून येतील, असा आशावादही या चर्चेमध्ये व्यक्त करण्यात आला.

===Photopath===

180621\18nsk_2_18062021_13.jpg

===Caption===

उद्योजक संवाद