शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नाशिकचा ‘इतिहास’ अधांतरी

By admin | Updated: December 12, 2015 23:16 IST

नियोजित जागेत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक साकारण्याचा राज ठाकरे यांचा मनसुबा

नाशिक : नाशिकच्या ६० हजार वर्षांच्या इतिहासाची पाने उलगडण्याच्या आतच इतिहासाचे पुस्तक बंद करण्याची वेळ सध्या आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवरायांच्या शस्त्रसंग्रहालयासाठी राज ठाकरे यांनी जी जागा निवडली आहे त्यामुळे इतिहास संशोधन संग्रहालयावरच गंडांतर आले आहे.नाशिकचा इतिहास आजकालचा नाही, तर तो तब्बल साठ वर्षांपूर्वीचा आहे, अगदी सबळ पुराव्यासह हवा असेल तर किमान तो ३० हजार वर्षांचा आहे. नाशिकचा हा इतिहास उलगडण्याची संधी मिळाली होती ती केंद्र शासनाच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमुळे! नदीकिनारा सुशोभिकरण प्रकल्पाअंतर्गत नाशिक महापालिकेने गोदाकिनारी विविध प्रकल्प आखले. त्यातील नाशिक इतिहास संशोधन संग्रहालय हा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेष म्हणजे महापालिकेने यातील नेहमीचे सरकारी अडथळे बाजूला करून हे काम गांभीर्याने करण्यासाठी याच विषयात रस असलेल्यांना पाचारण केले आणि व्यास रिसर्च सेंटर या संस्थेला ही जबाबदारी सोपवली. मूलत:च इतिहास संशोधनातील उत्साही युवकांचा समावेश असल्याने नाशिकच्या इतिहासाची सूक्ष्म माहिती संकलित केली. अंजनेरी हे सातवाहनाच्या कालावधीत सत्ता केंद्र होते... गौतमीपुत्र सातकर्णीची लढाई गोवर्धन येथे झाली होती... ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेण्यासाठी लढाया लढल्या; परंतु अगदी शेवटी नाशिक पडले... नाशिकला नऊ प्रवेशद्वारे होती, भडक दरवाजा-दिल्ली दरवाजा असे सारेच चौथाई वसुलीसाठी नाके होते... असा इतिहास उलगडण्याची तयारी सुरू झाली. म्युरल्स, मूर्ती यांच्याबरोबरच नाशिकमध्ये असलेल्या चौसोपी वाड्याच्या प्रतिकृतीबरोबरच इतिहास जागृत करण्यासाठी सात वाहनांच्या काळातील रस्त्यांची आठवण करून देणाऱ्या पद्धतीची रचना करण्याचे ठरविण्यात आले; परंतु आता या साऱ्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर राज यांनी ज्या ज्या ठिकाणी नवनिर्माण करता येईल अशा जागांचा शोध घेतला. त्यात गंगापूररोडवर पालिकेच्या जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेतील या प्रकल्पाचा समावेश होता. तेव्हापासून म्हणजे अडीच वर्षांपासून इतिहास संग्रहालयाचे काम ठप्प झाले. राज यांच्या मनात काही तरी आहे आणि आगळेवेगळे करणार याची जाणीव सर्वांनाच होती; परंतु ते कधी स्पष्ट होणार हे कोणी सांगू शकत नसल्याने प्रशासनानेदेखील प्रकल्पाचे काम पुढे जाऊ दिले नाही. वर्षभरापूर्वी राज यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पाचारण करून त्यांच्याकडील शस्त्रसंग्रह मिळविण्यासाठी भेट नियोजित केली; परंतु त्याला आता गेल्या महिन्यात मुहूर्त लागला. शस्त्रसंग्रहालयाबरोबरच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही तेथेच साकारण्याचे राज यांनी जाहीर केल्यानंतर त्याचे स्वागत केले जात असले तरी नाशिकच्या रखडलेल्या इतिहास संशोधन संग्रहालयाचे काय? याचे भविष्य मात्र कोणीही सांगू शकत नाही अशी अवस्था आहे.