शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवनात नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा

By admin | Updated: April 18, 2016 00:28 IST

सामाजिक बांधिलकी : कसबे सुकेणेहून एक कंटेनर द्राक्ष रवाना

कसबे सुकेणे : राज्याच्या मोठ्या शहरात किंवा लहान-मोठ्या गावात जरी द्राक्ष उपलब्ध होत असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसासारख्या दुर्गम आदिवासी भागात द्राक्ष मिळणे दुरापास्त. द्राक्ष उपलब्ध झाले तरी परिस्थितीअभावी गरीब आदिवासी ते विकत घेऊ शकत नाही. किंबहुना द्राक्ष पाहणेही त्यांना दुर्र्मीळच, या परिस्थितीचा अभ्यास करून कसबे सुकेणेतील एका मित्रमंडळ द्राक्षांची हीच अवीट गोडी गेल्या वर्षापासून आनंदवनात विनामूल्य पोहोचवण्याचे काम करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत कसबे सुकेणे येथील छत्रपती संभाजी महाराज कला व क्र ीडा मंडळाच्या वतीने यंदाही गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन व हेमलकसा येथे नाशिकच्या मधुर द्राक्षांचा गोडवा पोहोचवला आहे. शनिवारी सकाळी कसबे सुकेणे येथून द्राक्षांनी भरलेला एक कंटेनर गडचिरोलीकडे रवाना झाला. स्वर्गीय माधवराव पहिलवान यांच्या प्रेरणेतून कसबे सुकेणे येथे छत्रपती संभाजी महाराज कला व क्र ीडा मंडळ कार्यरत आहे. वर्षभर कला, क्र ीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्र म राबविण्याऱ्या या मंडळाचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. मराठी चित्रपट कलाकारांकडूनही या मंडळाच्या कार्याची दरवर्षी दाखल घेतली जाते. सिनेतारका कसबे सुकेणेला उपस्थिती लावून या युवकांच्या कार्याला प्रेरणाही देतात. सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्र म राबविणाऱ्या या मंडळाने यंदाही नाशिक तथा कसबे सुकेणे येथील द्राक्षांचा गोडवा गडचिरोलीतील आदिवासी भागातील आनंदवन व हेमलकसामधील रु ग्ण व आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवला आहे. येथील विजय अग्रो इंड्रस्टीज, नाशिक येथील विशाल ट्रान्सपोर्ट, दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथील भालेराव बंधू , कसबे सुकेणे येथील सुंदरी क्रि केट क्लब व संभाजीराजे कला, क्र ीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाचे दुसरे वर्ष आहे. कसबे सुकेणे येथील बाळासाहेब जाधव, आनंदराव जाधव, विजय जाधव, छगन जाधव, बाळा सरोदे, अनिल सरोदे, सचिन टिपाले, भाऊराज उगले यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी २५० द्राक्ष पेट्यांनी भरलेला पहिला कंटेनर गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाला असून, रविवारी दुपारी एक पथक गडचिरोलीत दाखल झाले असल्याचे समजते. येथील मंडळाने सुरू केलेल्या या उपक्र माचे लोकबिरादरीपासून ते नागपूर, नाशिकपर्यंत स्वागत होत आहे. (वार्ताहर)