नाशिक : पेठ तालुक्यातील डोंगरशेत येथील १७ वर्षीय मुलगी रानात बैल चारण्यासाठी गेली असता ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़ तिला उपचारासाठी प्रथम हरसूल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२२) पहाटे तिचा मृत्यू झाला़ कविता वामन भांगरे (१७, रा. डोंगरसेत, ता. पेठ) असे मयत मुलीचे नाव असून, तिला दोघांनी बळजबरी विष पाजल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बैलपोळ्याच्या दिवशी अर्थात सोमवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास बैल चारण्यासाठी कविता जंगलात गेली होती़ तिचा शोध घेतला असता कुटुंबीयांना ती विषारी औषध सेवन केलेल्या स्थितीत आढळून आली़ तिला तातडीने प्रथम हरसूल प्राथमिक आरोेग्य केंद्र व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तिच्यावर उपचार सुरू असताना सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला़दरम्यान, मुलगी कविता हिला दोन युवकांनी बळजबरी विषारी औषध पाजून तिचा खून केल्याचा आरोप वामन भांगरे यांनी केला असून, या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा खून की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत़
विषारी औषध पाजून युवतीचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:28 IST
नाशिक : पेठ तालुक्यातील डोंगरशेत येथील १७ वर्षीय मुलगी रानात बैल चारण्यासाठी गेली असता ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़ तिला उपचारासाठी प्रथम हरसूल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२२) पहाटे तिचा मृत्यू झाला़ कविता वामन भांगरे (१७, रा. डोंगरसेत, ता. पेठ) असे मयत मुलीचे नाव असून, तिला ...
विषारी औषध पाजून युवतीचा खून?
ठळक मुद्दे रानात बैल चारण्यासाठी गेली अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़दोघांनी बळजबरी विष पाजल्याचा वडिलांनी केला आरोप