शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांची पर्वणी घरातच

By admin | Updated: September 19, 2015 00:08 IST

वाहिन्यांवरून दूरदर्शन : पावसाने केले स्थानबद्ध

नाशिक : पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे, दुसऱ्या पर्वणीला मौनी अमावस्येला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे, तर तिसऱ्या पर्वणीला पावसाच्या संततधारेमुळे नाशिककरांना घरातच स्थानबद्ध होत पर्वणी साधावी लागली. बहुसंख्य नाशिककरांनी दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्या आणि लाइव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून पर्वणीचा आनंद लुटण्यात समाधान मानले.सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी दि. २९ आॅगस्टला पार पडली. पहिल्या पर्वणीला कोट्यवधी भाविक शहरात दाखल होतील या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरभर बॅरिकेडिंग करत नाशिककरांनाही बाहेर पडण्यास निर्बंध घातले. त्यामुळे नाशिककरांनी बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले होते. अतिरेकी बंदोबस्ताचा फटका भाविकांना बसल्यानंतर संख्येत घट झाली होती. त्यादिवशी रात्री उशिरा काही नाशिककरांनी गोदाघाट गाठला होता. दुसऱ्या पर्वणीला पोलिसांनी बंदोबस्त सैल केला असला तरी मौनी अमावास्येमुळे लाखोंच्या संख्येने भाविक शहरात आल्याने नाशिककरांनी या गर्दीत न जाणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत गोदाघाटावर भाविकांची मोठी गर्दी उसळलेली होती. आता तिसऱ्या आणि शेवटच्या पर्वणीला ऋषिपंचमी असली तरी भाविकांची संख्या घटण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्यामुळे अखेरची का होईना पर्वणी साधण्याचा मनोदय नाशिककरांकडून व्यक्त होत असतानाच वरुणराजाने शुक्रवारी पहाटे जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नाशिककरांनी भरपावसात गोदाघाटावर जाण्यास अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळे नाशिककरांच्या तुलनेत सायंकाळपर्यंत परगावाहून आलेल्या भाविकांचीच जास्त गर्दी गोदाघाटावर दिसून आली. घराबाहेर पडता न आल्याने बहुसंख्य नाशिककरांनी दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित होणाऱ्या बातम्या आणि लाइव्ह कव्हरेज पाहण्याला पसंती दर्शविली.