शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक तापले; तपमान ३८ अंशांवर

By admin | Updated: March 24, 2017 00:38 IST

नाशिक : नाशिकच्या तपमानाचा पारा चढता असून, गुरुवारी (दि.२३) शहराचे कमाल तपमान ३८.१ अंश इतके नोंदविले गेले

 नाशिक : नाशिकच्या तपमानाचा पारा चढता असून, गुरुवारी (दि.२३) शहराचे कमाल तपमान ३८.१ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच बुधवारपासून शहराच्या तपमानात वाढ होऊ लागल्याने वातावरण अतिउष्ण बनले असून, नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे.बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे ताप येण्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकेकाळी आरोग्यवर्धक हवामानासाठी नाशिक शहर ओळखले जात होते म्हणूनच अन्य शहरांमधून लोक हवा पालट करण्यासाठी नाशिकला पसंती देत होते; मात्र काळानुरूप शहराच्या हवामानाचे आरोग्य ढासळत असून, नाशिकलाही उष्म्याचा वाढता त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ३ मे २००२ साली नाशिकच्या कमाल तपमानाचा पारा सर्वाधिक ४३.९ अंश इतका नोंदविला गेला होता. हा उच्चांक राहिला असून, गेल्या पंधरा वर्षांमध्ये नाशिकरांनी कधीही एवढा प्रखर उन्हाळा अनुभवलेला नाही; मात्र यावर्षी मार्च महिन्याचे सात दिवस शिल्लक असून, पारा ३८ अंशांपर्यंत पोहचल्याने उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात कमाल तपमानाचा पारा ३८ अंशांच्या आसपास स्थिरावला होता; मात्र त्यावेळी हवेचा वेग अधिक असल्याने शहरात उष्मा कमी जाणवत होता. यावर्षी हवेचा वेग कमी झाला असून, तपमानाचा पारा चढता असल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रखर वाटू लागल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या दिवस आणि रात्र हे प्रत्येकी बारा तासांचे आहे. येत्या सात दिवसांत हवेचा वेग न वाढल्यास आणि ढगाळ हवामान राहिल्यास पारा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारी सकाळी आकाशात ढग जमा झाल्याने तपमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)