नाशिक : अहमदनगर येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची आज निवड करण्यात आली़ नाशिक शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष दीपक सोनवणे व उपस्थितांच्या हस्ते झाले़ यावेळी उपाध्यक्ष संजय तेजाळे, दीपक बागुल, एजाज शेख, आयुब खान, अफजल शेख, सुनील घरटे आदि उपस्थित होते़ निवड चाचणी स्पर्धेत जिल्'ातील ४२ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला़ परीक्षक म्हणून एजाज शेख, संजय तेजाळे, विवेक तांबे, अफजल खान यांनी काम पाहिले़ निवड झालेले संघ याप्रमाणे : मास्टर्स ४० वर्षांवरील : सुरेंद्र अहिरे, एजाज खान, मधुकर सरोदे, ५० वर्षे मास्टरर्स - मनोज कांबळे़ सिनियर गट : विमोद विजयन, योगेश नवले, राकेश सोनवणे, दिनेश हिंदवे, आशिष सिंग, अनिश राजपूत, प्रशांत गांगुर्डे, तांजिम शेख, स्वप्नील शेजवळ, नीलेश धोंडगे, सचिन जगताप़ ज्युनिअर गट : प्रकाश भंडारी, अजय मुदलीयार, शिवम बहोट, विशाल पाटील, संकेत कुंभकर्ण, सोमनाथ वैरागर, रविराज धाकराव, अमोल जाधव, निरज लचके, आकाश बर्डे, शब्बिर खान, सय्यद अबदुल्ला, सोएब शहा, नादीर शेख, तौसिफ शेख, कलीम शेख, अंबादास पगारे, रमेश केदारे, संदीप कापसे, अंकुश कुमार, शाहिल पाटेल, प्रशांत जाधव, ज्ञानेश्वर म्हस्के, नितीन शेळके़
राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिकचा संघ जाहीर
By admin | Updated: December 15, 2014 02:05 IST