शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-सिन्नर मार्ग अडकला न्यायालयीन लढाईत

By admin | Updated: May 26, 2014 13:09 IST

नाशिक-सिन्नर मार्ग अडकला न्यायालयीन लढाईत

 

नाशिक : जादा मोबदला मिळावा म्हणून जागामालकांनी लवादाकडे घेतलेली धाव, जमीन देण्यास नकार देणार्‍यांना न्यायालयाचा दिलासा, तोंडावर आलेला पावसाळा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट पाहता नाशिक-पुणे चौपदरीकरणांतर्गत होऊ पाहणार्‍या नाशिक-सिन्नरचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा रस्ता रहदारीस उपयोगात येण्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणात भूसंपादनाचा मोठा अडसर ठरला असून, अठरा जागामालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन राष्टÑीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणार्‍या भूसंपादनाला विरोध दर्शविला. परिणामी न्यायालयाने अठरा जागामालकांच्या ताब्यातील तीन हेक्टर जागा वगळून अन्य भूसंपादनातील मार्ग मोकळा केला; परंतु न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच चेहेडी ते सिन्नर या टप्प्यातील जवळपास १८० आणखी जागामालकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याच मार्गाने पाच ते सहा जागामालकांची वाटचाल असून, न्यायालयाने नव्याने कोणतेही आदेश याबाबत दिलेले नसले तरी, २६ जून रोजी त्याची सुनावणी ठेवली आहे. याचबरोबर १३० मालकांनी चौपदरीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली; परंतु शासनाने निश्चित केलेला दर कमी असल्याचे कारण सांगत वाढीव मोबदल्यासाठी लवादाकडे धाव घेतली आहे. जानेवारी महिन्यात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने लवाद म्हणून जिल्हाधिकारी विलास पाटील यांची नेमणूक केली होती; परंतु लवादाचे काम पुढे सरकू शकले नाही. आता मात्र पुन्हा प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून, येत्या पंधरा दिवसांत लवादाची सुनावणी होण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर व्यक्तकेली जात आहे. नाशिकरोड उड्डाणपूल ते मुसळगाव औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ गेल्यावर्षी जूनमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यासाठी भूसंपादन करून जागा ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा करार यापूर्वीच झाला आहे. परंतु आता जागेअभावी या रस्त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक-सिन्नर-पुणे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम राहण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)