शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यकृत-मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी नाशिक-पुणे ‘ग्रीन कॉरिडॉर

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

’गरजूंना जीवनदान : सामाजिक बांधिलकी; चार तासांत गाठले पुण्याचे रुग्णालय

 नाशिक : वेळ साडेअकरा वाजेची. ठिकाण मॅरेथॉन चौक, गंगापूररोड. ऋषिकेश रुग्णालयाबाहेर उभी असलेली रुग्णवाहिका व वाहतूक पोलिसांची वाहने. सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळवारी (दि.१०) सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांनी वाहतूक शाखेचे अधिकारी ‘अ‍ॅलर्ट मिशन ग्रीन कॉरिडॉर’ची सूचना वायरलेसवरून देतात आणि पुढच्या पाचव्या मिनिटाला अवयव घेऊन पोलिसांच्या पायलट वाहनांबरोबर रुग्णवाहिका (एमएच १२, केक्यू १६२०) वाऱ्याच्या वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली. शनिवारी (दि.७) मेंदूला त्रास झाल्याने शोभा शंकर लोणारे (५३, रा. सिन्नर, शिवाजीनगर) यांना नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करून सह्याद्रीच्या वैद्यकीय सूत्रांनी ऋषिकेश रुग्णालयामध्ये सोमवारी रात्री अकरा वाजता त्यांना हलविले. आज (दि.१०) पहाटे लोणारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याची माहिती सह्याद्रीच्या वैद्यकीय सूत्रांकडून सोमवारीच मिळाली होती. पुणे येथील सह्याद्रीच्या मुख्य रुग्णालयात एक यकृताचा व दुसरा मूत्रपिंडाचा गरजू रुग्ण येथील दीनानाथ रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्यांना मरणोत्तर मयताचे अवयव मिळाले तर जीवनदान मिळू शकेल, असे डॉक्टरांकडून नातेवाइकांना समुपदेशन करण्यात आले. ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक भाऊसाहेब मोरे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर नातेवाइकांनी होकार दर्शविला. दरम्यान, पहाटे लोणारे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे यकृत, मूत्रपिंड, डोळे हे अवयव सुरक्षितरीत्या गंगापूर रुग्णालयात डॉक्टरांनी काढले. दरम्यान, पावणे बारा वाजता यकृत व एक मूत्रपिंड घेऊन रुग्णवाहिका ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने सव्वा चार तासांमध्ये पुणे येथील सह्याद्री डेक्कन रुग्णालयात पोहचली. तेथे गरजू रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया केंद्र सज्ज ठेवण्यात आले होते. तत्काळ यकृत प्रत्यारोपणासाठी सह्याद्रीच्या चमूने वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली. तसेच येथील दीनानाथ रुग्णालयातही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाला मूत्रपिंड शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच दुसरे मूत्रपिंड ऋषिकेश हॉस्पिटलमध्येच गरजूला प्रत्यारोपण केले गेले. तसेच सुशील नेत्र रुग्णालयाकडे गरजूंसाठी डोळे पाठविण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, शंकर काळे यांच्यासह पोलीस नियंत्रण कक्ष, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस आदिंच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नाशिकमधून पहिल्यांदाच राबविण्यात आलेले ‘ग्रीन कॅरिडॉर’ मिशन फत्ते झाले. यावेळी लोणारे यांची दोन मुले, सून, भाऊ, बहीण, भावजई रुग्णालयात उपस्थित होते.