शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

प्रायव्हेट क्लासमध्ये नाशिकचा लोखंडे विजेता

By admin | Updated: May 19, 2014 01:12 IST

एमआरएफ सुपरक्रॉस : फॉरेन क्लासचा के. पी. अरविंद अजिंक्य

एमआरएफ सुपरक्रॉस : फॉरेन क्लासचा के. पी. अरविंद अजिंक्यनाशिक : तब्बल १५ वर्षांनंतर नाशकात झालेल्या एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नाशिकच्या गणेश लोखंडे याने नामांकित रायडर्सला मागे टाकत प्रायव्हेट क्लासचे विजेतेपद पटकावले, तर फॉरेन क्लासमध्ये अपेक्षेप्रमाणे नॅशनल चॅम्पियन बंगळुरूचा के. पी. अरविंद याने चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. सदरील स्पर्धेची दुसरी फेरी पुण्यात रंगणार आहे. पाथर्डी गावालगत व पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य परिसरातील कुटेज् डर्टी ट्रॅकवर एमआरएफ मॉग्रीफ सुपरक्रॉस चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीची स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाली. एमआरएफ व गॉडस्पीड आणि ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (नासा) आयोजित करण्यात आलेल्या सदरील स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवरील रायडर्ससह नाशिकचेही रायडर्स सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धेमध्ये जबरदस्त चुरस पाहावयास मिळाली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महत्त्वाच्या फॉरेन क्लासमध्ये नॅशनल चॅम्पियन बंगळुरूचा के. पी. अरविंद याने पहिल्या फेरीत अव्वल, तर दुसर्‍या फेरीत दुसर्‍या स्थानावर असतानाही वेग अन् गुण कमविण्यात अव्वल ठरल्याने या गटाचा तो विजेता ठरला. त्याने दोन्ही फेर्‍यांतून ३७ गुण मिळविले. दुसर्‍या स्थानी त्याचाच साथीदार हरिथ नोहा राहिला. पहिल्या फेरीत दुसरे, तर दुसर्‍या फेरीत त्याने अव्वल स्थान पटकावत अरविंदला मागे टाकले होते. दोघांनीही समान गुण मिळविले असले, तरी वेगात मात्र कमी पडल्याने त्याला उपविजेता पदावरच समाधान मानावे लागले. तिसर्‍या स्थानी प्रमोद जोशुवा (३० गुण), चौथ्या स्थानी जयपूरचा गौरव खत्री (२६ गुण), तर नागपूरचा जतिन जैन (२२ गुण) पाचव्या स्थानी राहिला. सदर स्पर्धेच्या प्रायव्हेट क्लासमध्ये नाशिकच्या गणेश लोखंडे याने अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये नामांकित रायडर्सला मागे टाकत ४० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. विशेषत: त्याने दोन्ही फेर्‍यांमध्ये अव्वल स्थान राखत निर्विवाद वर्चस्व राखले. दुसर्‍या स्थानी राहिलेल्या जिग्नेश पटेल याने लोखंडेला मागे टाकण्याचा प्रत्येक वळणावर प्रयत्न केला; परंतु गणेशच्या वेगापुढे तो कमी पडला. त्याने ३२ गुण घेतले. पुण्याचा अश्विन जाधवही ३२ गुणांसह तिसर्‍या, तर मंुबईचा जईन खान व नाशिकचा आदित्य ठक्कर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले. सदर स्पर्धेची दुसरी फेरी पुण्यात रंगणार आहे. ज्युनिअर्समध्ये ऋग्वेद प्रथमस्पर्धेसाठीचे खास आकर्षण असलेल्या लहान गटात अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या ऋग्वेद बारगुजे याने अव्वल स्थान पटकावले. दुसर्‍या स्थानी यश पवार, तिसर्‍या स्थानी पुण्याचाच युवराज कोंडे देशमुख, तर मंुबईचा अश्विनद्र विर्दी व सार्थक चव्हाण हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्य स्थानी राहिले. नाशिकच्या कोहोकची रायडिंगज्युनिअर्स गटाच्या प्रदर्शनीय स्पर्धेत सर्वात लहान अर्थात ८ ते ९ वर्षांचे तिघे सहभागी झाले होते. यात नाशिकचा अवॉन कोहोक, पुण्याचा युवराज कोंडे देशमुख आणि सार्थक चव्हाण यांचा समावेश होता. युवराज तर तरबेज रायडर्ससारखी कसरत दाखवित उंचवट्यांवरून जम्प घेत होता. अवघड वळणावर माती उडवित राईड करीत त्याने उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले होते.