शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीत प्रथम आलेला अहिरे ठरला नाशिकभूषण

By admin | Updated: March 16, 2017 23:41 IST

नाशिक : मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने अभ्यासक्रम करून एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेला भूषण अशोक अहिरे हा खऱ्या अर्थाने नाशिकभूषण ठरला आहे.

 नाशिक : मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने अभ्यासक्रम करून एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेला भूषण अशोक अहिरे हा खऱ्या अर्थाने नाशिकभूषण ठरला आहे. त्याच्या यशाच्या निमित्ताने नाशिकला राज्यस्तरावर यश प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी म्हणून करिअर करण्याचे स्वप्न साकार झालेच; परंतु राज्यात प्रथम येण्यामुळे आनंद शतगुणीत झाल्याची भावना भूषण याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नाशिकच्या विजय ममता चित्रपटगृहामागील रॉयल कॉलनी येथे राहणाऱ्या भूषण अहिरे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्यावर्षी घेतलेल्या एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत ५२६ गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. भूषण याने सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी चार वर्षांपासून सुरू केली होती. २०१४ मध्ये अवघ्या एका गुणाने त्याची पोलीस उपअधीक्षकपदाची संधी हुकली. त्याचे शल्य मनामध्ये होते. त्याऐवजी मंत्रालयात डेस्क आॅफिसर म्हणून नियुक्ती मिळाली होती. ती न स्वीकारता एक वर्ष आणखी सराव करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार अभ्यास केला. माझ्या शिक्षक आणि सहकारी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यात पहिल्या पाचमध्ये माझा क्रमांक असेल असे मला वाटत होेते, परंतु थेट राज्यात प्रथम येईल, अशी खात्री नव्हती. आज या यशामुळे माझी स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. मूळचा सटाणा तालुक्यातील गोराणे येथील रहिवासी असलेल्या अहिरे कुटुंबात भूषणचे आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत. वडील अशोक अहिरे हे भगूर येथील नूतन विद्या मंदिरात मुख्याध्यापक आहेत. तर आई सुनीता या जिल्हा परिषदेच्या शेवगे दारणा येथील शाळेत पदवीधर शिक्षिका आहेत. भूषण याने शालेय शिक्षण नूतन विद्या मंंदिरात घेतले तर बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयात घेतले. त्यानंतर भुजबळ नॉलेज सिटीत अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्याला अनेक खासगी कंपन्यांच्या आॅफर्स आल्या होत्या. परंतु बड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून सरकारी अधिकारी म्हणून करिअर करण्याचे ठरवले. आहिरे दाम्पत्याला भूषण हा एकुलता एक मुलगा असून त्याने ‘भूषण’ म्हणून खऱ्या अर्थाने नाव सार्थ केल्याची भावना त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. भूषण अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे. त्याने कायम यश मिळविले आणि आता उपजिल्हाधिकारी म्हणून त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. भूषण हे नाव त्याने सार्थक केले आहे.- सुनीता अहिरे, आई