शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बहरिन, मॉरिशस देशांपेक्षाही नाशिकचे लसीकरण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : वीस लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या देशांना मागे टाकत नाशिक जिल्ह्याने २५ लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. ...

नाशिक : वीस लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या देशांना मागे टाकत नाशिक जिल्ह्याने २५ लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. बहरिन या देशाची लोकसंख्या १६ लाख, तर मॉरिशसची लोकसंख्या अवघी १२ लाख इतकी आहे. त्या तुलनेत नाशिक जिल्ह्याने कितीतरी पटीने अधिक लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या पाच देशांपेक्षा एकट्या नाशिक जिल्ह्याचे लसीकरण २५ लाखांवर पोहोचले आहे. सोमवारी एकाच दिवशी ५६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून विक्रमही करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलेे आहे. केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या लसींचे वितरण करताना ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल राखण्यासाठी वाटपाचे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसींचे पहिले आणि दुसरे डोस आरोग्य विभागाला वितरित केले जात आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनानुसार नाशिक जिल्ह्याने लसीकरणात आगेकूच सुरूच ठेवली असल्याचे दिसते. जिल्ह्याने आतापर्यंत २५ लाख ६ हजार ६३३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. नाशिकमधील लसीकरण हे बहरिन, माॅरिशस या देशांनाही मागे टाकणारे आहे. फिजी, भुतान आणि मालदीव या देशांमधील लोकसंख्येपेक्षा नाशिकचे लसीकरण हे अधिक करण्यात आलेले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्याने २५ लाख सहा हजार ६३३ नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला.

--इन्फो--

१ लाख २२ हजार डोस प्राप्त

दोन दिवसांपूर्वीच लसींचे ९२ हजार डोस प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा लसींचा मोठा साठा उपलब्ध झाला आहे. मंगळवारी (दि. ३१) जिल्ह्याला एक लाख २२ हजार ६८० लसीचे डोस प्राप्त झाले. एका दिवसात जिल्ह्याला सर्वाधिक लस प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. रविवार, २९ ऑगस्ट रोजी लसीचे ९३ हजार डोस प्राप्त झाले होते. १३ ते १५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस डोस प्राप्त झाल्याने लसीकरणाची गती वाढण्यास मदत झाली होती.