शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात घासलेट घोटाळा?

By admin | Updated: November 12, 2016 00:41 IST

मागणी घटली : वापरकर्त्यांची माहिती गुलदस्त्यात

नाशिक : दोन गॅस सिलिंडरधारकास घासलेट न देण्याचा निर्णय घेऊन ज्यांच्याकडे गॅस नाही अशा पात्र शिधापत्रिकाधारकांनाच गेल्या सात महिन्यांपासून घासलेट वाटप केले जात असताना आता मात्र असे घासलेट घेणारा कोणीच पुढे येत नसल्याने सात महिन्यांपासूनच्या लाखो लिटरच्या घासलेटचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळेच की काय पुरवठा विभागाने चालू महिन्यात घासलेटची मागणी चक्क एक टक्क्यावर आणल्याने नजीकच्या काळात घासलेटच नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने अलीकडेच राज्य सरकारांना पत्र पाठवून ज्या शिधापत्रिकाधारकांना घासलेट दिले जाते, त्या ग्राहकांचे आधारक्रमांक गोळा करण्याचे आदेश दिले. ३१ आॅक्टोंबरपर्यंत ही माहिती जमा करून त्या आधारे नोव्हेंबरमध्ये वाटप करावयाच्या घासलेटचा कोटा निश्चित करण्याची मुदतही घालून देण्यात आली होती. या संदर्भात पुरवठा विभागाने प्रत्येक घासलेट परवानाधारकांना कल्पना देवून त्यांच्याकडून घासलेट नेणाऱ्या ग्राहकांचे आधारक्रमांक गोळा करून आणून देण्याचे आवाहन केले. परंतु त्याला प्रतिसादच मिळाला नाही. केंद्र सरकारने १ एप्रिलपासून दोन गॅस सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकास घासलेट न देण्याचा निर्णय घेतला होता. हे करताना ज्यांना घासलेट दिले जाणार आहे अशांची यादीही रेशन दुकानदार व घासलेट परवानाधारकांकडून घेण्यात आली. या यादीच्या आधारेच एप्रिलपासून जिल्ह्णात जवळपास १२ लाख ८४ हजार लिटर घासलेटचे वितरण सुरू झाले. दरमहा इतक्या मोठ्या प्रमाणावर घासलेट जिल्ह्णात वितरित होत असताना त्यात पुरवठा खात्याच्या आदेशान्वये काही शिधापत्रिकाधारकांकडून गॅस नसल्याबाबतचे बंधपत्र भरून घेण्यात आले व ज्यांना घासलेट दिले जात आहे ते नियमानुसार व कायदेशीर असल्याचा पवित्रा पुरवठा खात्याने घेतला तर दुसरीकडे ज्या रेशन दुकानदार व घासलेट विक्रेत्यांनी बंधपत्र भरून देण्यास नकार दिला अशा शहरातील सुमारे साडेतीनशे दुकानदारांचा घासलेट पुरवठा बंद केला होता. आता मात्र ज्या शेकडो घासलेट विक्रेत्यांना तसेच रेशन दुकानदारांना पुरवठा खात्याच्या मर्जीने गेल्या सात महिन्यांपासून घासलेट वाटप करण्यात आले, त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच दुकानदारांनी ज्यांना घासलेट विक्री केली त्यांचे आधारक्रमांकाची माहिती पुरवठा विभागााला सादर केली आहे. याचाच अर्थ गेल्या सात महिन्यात जिल्ह्णात ज्यांच्या नावे घासलेट उचलण्यात आले, त्या व्यक्ती अस्तित्वातच नसून त्यांच्याआड घासलेटचा काळाबाजार झाल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)