शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, दिंडोरीत मतदानाचा टक्का वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:10 IST

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे.

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. नाशिक मतदारसंघात गेल्या वेळपेक्षा अर्ध्या टक्क्याने वाढ झाली असली तरी, दिंडोरीत मात्र हेच प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिलेल्या विशेष सोयी व सामाजिक संस्था, संघटनांकडून मतदानासाठी करण्यात आलेल्या आवाहनामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा अर्थ काढला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मतदान आटोपल्यानंतर तब्बल २४ तासांनंतर मतदान यंत्रे अंबडच्या गुदामात सीलबंद करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात १९०७ व दिंडोरी मतदारसंघासाठी १८८४ मतदार केंद्रांत सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. नाशिकपेक्षा दिंडोरी मतदारसंघातील ग्रामीण भागात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. सकाळच्या दोन तासांत दिंडोरीत जवळपास ७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, त्यामानाने नाशिक मतदारसंघात हे प्रमाण काहीसे कमी होते. त्यानंतर मात्र ९ वाजेपासून शहरी भागातील मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मात्र उन्हामुळे मतदानाचा टक्का थंडावला. दुपारी १ ते ३ या काळात नाशिक मतदारसंघात अवघे तीन टक्के मतदान झाले, तर दिंडोरीत हेच प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत पोहोचले. शेवटच्या तीन  तासांत मात्र पुन्हा एकदा मतदारांची गर्दी दिसून आली.  सायंकाळी सहानंतरही काही मतदार केंद्रांवर रांगा लागल्याने त्या सर्वांना मतदान करू देण्यात आले.  सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. तथापि, मंगळवारी दुपारपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसला आणण्यात आल्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात नाशिक मतदारसंघात ५९.४० टक्के, तर दिंडोरीत ६५.४४ टक्के मतदान झाले. सन २००४ मध्ये हेच प्रमाण नाशिकमध्ये ५८.८२ टक्के, तर दिंडोरीत ६३.४० टक्के मतदान झाले होते. यंदा दोन्ही मतदारसंघात सर्वाधिक मतदानाचा मान दिंडोरी विधानसभेला मिळाला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.०५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्या खालोखाल कळवण विधानसभा मतदारसंघात ७२.५३ टक्के मतदान झाले. नांदगावमध्ये ५७.४९ टक्के, चांदवडला ६५.०७ टक्के, येवला ६१.१५ टक्के, निफाडला ६३.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ६७.४१ टक्के झाले. त्याखालोखाल सिन्नरला ६४.९७ टक्के, देवळाली ६०.७२ टक्के, नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये ५५.०६ टक्के, नाशिक मध्य ५५.९५ टक्के, तर नाशिक पश्चिम मध्ये ५५.६१ टक्के मतदान झाले. सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्याने आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक