शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नासाकाचा हंगाम अडकला ‘तोडग्यात’

By admin | Updated: June 10, 2014 00:38 IST

कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

 

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत कामगार युनियन व सभासदांनी कारखाना कार्यक्षेत्रावर मेळावा घेऊन नासाका पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतानाच, नाशिक साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत.रविवारीच नाशिक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सभासद व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होऊन मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत यंदाचा नासाकाचा गळीत हंगाम सुरू करायचाच, असा निर्धार करण्यात आला. नासाकाच्या कार्यक्षेत्रावर असलेली सुमारे ३५ कोटींची साखर विक्री करून जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कर्ज फेडण्याबरोबरच नासाका कामगारांचे थकीत वेतन देण्याबाबत संचालक मंडळ व जिल्हा बॅँकेच्या वतीने संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने कामगार, संचालक मंडळ व जिल्हा बॅँक यांचा संंयुक्त त्रिपक्षीय करार तयार केला असून, त्यावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतरच साखर विक्री व कामगारांचे वेतन निघण्याची शक्यता आहे; मात्र संचालक मंडळाने त्यास विरोध दर्शविताना, साखर विक्री करून जिल्हा बॅँकेचे कर्ज फेडलेच तर उर्वरित थकीत कर्ज व गळीत हंगामासाठी आवश्यक नऊ कोटींचा निधी कसा उभा करणार, असा सवाल उपस्थित केला आहे; तर जिल्हा बॅँकेने, नाबार्ड अथवा शासनाच्या हमीशिवाय पुन्हा कर्ज कसे देणार, असा पवित्रा घेतला आहे. त्यातही नासाकाचे काही संचालक सरकारकडे जाऊन नासाकासाठी सरकारी ‘हमी’ मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. नासाकाच्या एका पदाधिकाऱ्याने सोमवारी जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाशी चर्चा करून नासाकाच्या गळीत हंगामासाठी जिल्हा बॅँकेने कर्ज द्यावे, बदल्यात आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचे समजते. (प्रतिनिधी)