शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वरला परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

By admin | Updated: November 8, 2016 01:29 IST

थंडीचा जोर वाढला : हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी दाखल; फ्लेमिंगोची प्रतीक्षा कायम

अझहर शेख  नाशिकराष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे. विजयादशमीचा सण साजरा होताच विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सीमोल्लंघन करत नांदूरमधमेश्वरचे जलाशय गाठण्यास सुरुवात केली असून, सध्या या ठिकाणी देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा भरला आहे. स्थानिक स्थलांतरित पक्षी जणू यजमानाच्या भूमिकेत असून, पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचे किलबिलाटावरून लक्षात येते. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून निफाडची ओळख आहे. यावर्षी जिल्ह्यासह निफाडमध्ये जोरदार पाऊस झाल्याने थंडीचे दमदार आगमन झाले आहे. निफाडच्या हद्दीत पोहचताच सकाळी बोचऱ्या थंडीचा अनुभव येतो. बुधवारी नाशिकचा पारा थेट १०.५ अंशावर पोहचल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. चालू आठवड्यापासूनच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी दाखल होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत सुमारे वीस प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात विहार करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून भेट दिली जात आहे.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे येथील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले. सध्या गोदाकाठ पंचक्रोशीत गुलाबी थंडी जाणवू लागली असून, नोव्हेंबर अखेर थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे पक्ष्यांचे थवेही मोठ्या प्रमाणात येथील जलाशयावर दाखल होणार असल्याचे पक्षीनिरिक्षकांचे म्हणणे आहे.