शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर-मानूर रस्त्याची चाळण

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

नांदूर-मानूर रस्त्याची चाळण

 

नाशिक : महापालिका हद्दीतील नांदूर- मानूर या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावर खडी पसरल्याने येथून मार्गक्रमण करणे मुश्कील झाले आहे. नांदूर ते जेलरोड रस्ता हा अलीकडे प्रचंड वाहतुकीचा रस्ता बनला आहे. जेलरोड आणि औरंगाबाद महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक वाढलेली आहे. शिवाय जेलरोडचा झालेला विस्तार आणि हॉटेल जत्रा मार्गावरील वाढलेली वसाहत यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. परंतु या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता या रस्त्याला कुणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नांदूर फाट्यापासून ते जेलरोडवरील जनार्दन स्वामी पुलापर्यंतचा मार्ग अत्यंत खडतर बनलेला आहे. या मार्गावर काही गॅरेज, नागरी वसाहत, व्यापारी संकुल तसेच मनपाची शाळादेखील आहे. शिवाय नियमित वाहनांची वर्दळही सुरू असते. नाशिकरोडला आणि औरंगाबादा फाटा, तसेच हॉटेल जत्राकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या मार्गावरील जनार्दन स्वामी पुलावरील रस्ता खडबडीत झाला आहे. मनपा शाळेसमोरील रस्ता खड्डेमय आहे, तर नांदूर गावच्या पुलापासून नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर खाचखळगे पडले आहेत. (प्रतिनिधी) नांदूर नाका ते जेलरोड जनार्दन स्वामी पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामात आत्तापर्यंत केवळ खडीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरण करण्यात येणाऱ्या मार्गावरील खडीही आता उखडली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रुंदीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे कामच बंद पडले आहे. नांदूर नाक्यावर वर्षभर अनेक कार्यक्रम घेतले जातात; परंतु रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही.  जेलरोड येथील जनार्दन स्वामी पूल हा खड्ड्यांमुळे धोकेदायक बनला आहे. संपूर्ण पुलावरील रस्ता उखडला असून, वाहनांना येथून हळूहळू वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने नेताना अंदाज न आल्यामुळे चालकाचा वाहनांवरील ताबा सुटण्याचाही धोका संभवतो.