शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरचा लांडे खून खटला नाशिक न्यायालयात वर्ग

By admin | Updated: August 12, 2014 02:03 IST

नगरचा लांडे खून खटला नाशिक न्यायालयात वर्ग

 

नाशिक : अहमदनगर येथील बहुचर्चित अशोक लांडे खून खटला नाशिकच्या जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला असून, यात भाजपाच्या आमदारासह तत्कालीन महापौरांवर गुन्हे दाखल आहेत़ या खटल्यातील कागदपत्रांच्या तपासणीनंतर दोषारोपपत्र दाखल होणार आहेत़अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे लॉटरी विक्रेता अशोक धनराज लांडे या युवकाचा १९ मे २००८ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता़ परंतु मोटार अपघातात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते़ याचा संशय आल्याने अहमदनगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी घटनेची छायाचित्रे औरंगाबाद वैद्यकीय रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवली होती़ त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिर्यादी शंकरराव राऊत यांच्या तक्रारीवरून भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले, तत्कालीन महापौर संदीप कोतकर, त्यांचे वडील भानुदास कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब उन्हवणे यांच्यासह १५ संशयितांवर लांडे याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला अहमदनगर न्यायालयात प्रलंबित होता़ या खटल्याचे काम नि:पक्षपातीपणे होण्यासाठी हा खटला नाशिक न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती़ त्यानुसार हा खटला नाशिक जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे़ न्या़ एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात तो चालणार आहे़ दरम्यान, कागदपत्रांच्या तपासणीनंतर खटल्याचे दोषारोपपत्र निश्चित होणार असून, त्यानंतर होणाऱ्या सुनावणीत साक्षीदार तपासले जाणार आहेत, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील श्रीधर माने यांनी दिली़ मालेगाव : शहरातील मुशावरत चौकाजवळ भरधाव वेगातील रिक्षाने धडक दिल्याने अब्दुुल वाहिद हा दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी मोहंमद हुसेन रा. नंदननगर याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन फरार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.