शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नॅब महाराष्ट्रच्या ब्रेल लायब्ररी

By admin | Updated: February 14, 2017 17:04 IST

नॅब महाराष्ट्र-अ‍ॅम्वे अ‍ॅपॉर्च्युनिटी फाउंडेशन ब्रेल लायब्ररीचे सातपूरच्या नॅब संकुल येथे मंगळवारी (दि.१४) सकाळी दिमाखात उद्घाटन झाले.

नाशिक : नॅब महाराष्ट्र-अ‍ॅम्वे अ‍ॅपॉर्च्युनिटी फाउंडेशन ब्रेल लायब्ररीचे सातपूरच्या नॅब संकुल येथे मंगळवारी (दि.१४) सकाळी दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅम्वेचे क्षेत्रीय व्यवस्थापक जिग्नेश मेहता, कल्याणी पवार, दिलीप निकम, नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, महासचिव गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदि मान्यवर उपस्थित होते. ब्रेल लिपीतील शैक्षणिक पुस्तके, फिक्शन, सेल्फ-हेल्प, जनरल नॉलेज आदि प्रकारांतील २०० पुस्तके आणि नियतकालिक यांची ब्रेल आवृत्तीतील पुस्तके व ६०० हून अधिक प्रकारची आॅडिओ सीडी प्रकारातली पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिग्नेश मेहता यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अंध व्यक्तींच्या कल्याणासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत. शिक्षण आणि ज्ञान हे शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करण्यासाठी उज्ज्वल भविष्याची चावी आहे. ब्रेल लायब्ररी यासाठीच्या उपक्रमात महत्त्वाचा भाग आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या राज्यातील संस्थांसाठी अशा प्रकारच्या ३१ लायब्ररी तयार करण्याचा निर्धार केला असल्याचेही मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले. महानॅब शाळेतील विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रतिमा पूजनानंतर लायब्ररीतील ब्रेल पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ब्रेल लायब्ररीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. एका पुस्तकाची आॅडिओ क्लिप ऐकून त्याचेही प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. निवेदक श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नॅब, अ‍ॅम्वेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.