शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:02 IST

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनाही हायसे वाटले आहे. सोमवारी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्ण विश्रांती घेऊन नागरिकांना सूर्यदर्शन घडविल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण तयार झाले. त्यामुळे जनजीवनही सुरळीत पार पडले. गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार लावल्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. जिल्ह्यातील धरणांमध्ये ६१ टक्के पाणी साठा असून, त्यातील गंगापूर, दारणा, कादवा, वालदेवी, आळंदी या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ आली होती. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाण्यात कपात करण्यात आली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात फक्त १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त जेमतेम २६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात भात लावणीला वेग आला असून, अतिवृष्टी व पावसाच्या संततधारेमुळे दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय, अशी भीती बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूरचे पाणी थांबवलेसोमवार दुपारनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी रात्री ८ वाजता बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर ७५ टक्के इतका पाणीसाठा असून, संपूर्ण धरण समूहात ८१ टक्के पाणी साठले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी बंद करण्यात येत असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.