शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मविप्रमध्ये प्रगतीचीच सरशी; समाज विकासला ‘नारळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:18 IST

नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. तर अध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस या पदांवर एकतर्फी विजय मिळवित प्रगतीच्या कप-बशीने सरशी साधली.

नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. तर अध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस या पदांवर एकतर्फी विजय मिळवित प्रगतीच्या कप-बशीने सरशी साधली.येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये सोमवारी (दि.१४) सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. पदाधिकारी पदांसाठी मतमोजणी जिमखाना हॉलच्या वरच्या बाजूस तर १३ संचालक पदांसाठी मतमोजणी जिमखान्याच्या तळमजल्यावर झाली. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीसाठी मतपत्रिकांची विगतवारी (विभागणी) करण्यात आली. त्यासाठी तब्बल सात तास लागले.दुपारी चार वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यात तिसºया व चौथ्या फेरीत दिंडोरी व बागलाण तालुका संचालक पदाचे प्रगतीचे उमेदवार काही मतांनी पिछाडीवर पडले होते. मात्र नंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पिछाडी भरून काढत आठव्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली. चिटणीस पदाचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. पाचव्या फेरीत डॉ. सुनील ढिकले यांना नानासाहेब बोरस्ते यांच्यापेक्षा दोनशे मते कमी मिळूनही चार फेरीत ते ६०० मतांनी आघाडीवर असल्याने ४०० मतांची त्यांची आघाडी कायम होती. पुढे आठव्या फेरीअखेर ही आघाडी १२०० मतांनी वाढली. नाशिक ग्रामीण संचालक पदासाठी आठव्या फेरीअखेर सचिन पिंगळे यांनी निर्णायक ७७५ मतांची आघाडी घेतली होती. अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांचा डॉ. तुषार शेवाळे यांनी तब्बल ७१६ मतांनी पराभव केला. तर सभापती पदाच्या निवडणुकीत माणिकराव बोरस्ते यांनी दिलीप मोरे यांचा ३५५ मतांनी पराभव केल्याचे शेवटची माहिती येण्यापर्यंतचे वृत्त होते. उपसभापती पदासाठी राघो अहिरे यांनी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांचा पराभव केला.