शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेचा ठराव : अनेक चौक, रस्त्यांचे नामकरण

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

नूतन कार्यालयास राजीव गांधींचे नाव

 सिन्नर : सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे ‘राजीव गांधी भवन’ म्हणून नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेच्या बैठकीत करण्यात आला. नगराध्यक्ष आश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत शहरातील अनेक चौक, नवीन वास्तू व व्यापारी संकुल, शहरातील अनेक रस्ते यांना विविध थोर पुरुषांची नावे देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. नाट्यगृहाच्या इमारतीचे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ असे नामकरण करण्यात आले असून, या नाट्यमंदिरातील रंगमंच महाकवी वामनदादा कर्डक म्हणून,तर कलादालन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नावाने ओळखले जाणार आहे. हुतात्मा स्मारक हुतात्मा सिव्हीक इनक्लेव्ह, वावीवेस पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर प्रवेशद्वार, वावीवेस चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक चौक महात्मा जोतिबा फुले, अग्निशामक केंद्राची इमारत एकलव्य अग्निशामक भवन, क्रीडा संकुल शिवपुत्र धर्मवीर राजे संभाजी क्रीडा संकुल, पंचायत समिती कार्यालय यशवंत चव्हाण भवन म्हणून ओळखले जाणार आहे. गंगावेस भागातील व्यापारी संकुल लोकनेते गोपिनाथ मुंडे व्यापारी संकुल, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन ग्राहक भांडार राजमाता जिजाऊ महिला बचत गटांचे उत्पादित मालाचे विक्री केंद्र म्हणून उदयास येत आहे, तर शहरातील काही रस्त्यांचे नामकरण पुढीलप्रमाण करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. न्हावी गल्ली-संत गोरोबा काका मार्ग, तानाजी चौक ते कुरणे गल्ली- मौलाना अब्दुल कलाम आझादरोड, आडवा फाटा ते सरदवाडी रोड-क्रांतिवीर वसंतराव नाईक मार्ग, सोनार देवी मंदिर ते चांडक बंगला- संत नरहरी महाराज मार्ग, वावी वेस ते फुले हायस्कूल-स्व. शंकरबाबा लोंढे मार्ग, पडकी वेस ते गणेशपेठ रोड- स्व. हेमंतआबा देशमुख मार्ग, खडकपुरा ते गंगावेस- स्व. विष्णू लाडुजी वंजारी मार्ग, लालचौक ते व्यापारी बॅँक- महालक्ष्मी रोड, खाटीक गल्ली ते बी. जी. क्षत्रिय सायकल दुकान- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर मार्ग. बैठकीस उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, नगरसेवक बापू गोजरे, संजय नवसे, हर्षद देशमुख, मेहमूद दारूवाला, मल्लू पाबळे, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, उज्ज्वला खालकर, लता मुंडे, लता हिले, सुजाता गाडे, मंगला जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)