शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा

By admin | Updated: July 1, 2017 00:35 IST

सिडको : येथील पेलिकन पार्क, बडदेनगर रस्ता, बाळासाहेब ठाकरे उद्यान, गणेश चौक उद्यानासह प्रलंबित असलेल्या नागरी विकासकामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील पेलिकन पार्क, बडदेनगर रस्ता, बाळासाहेब ठाकरे उद्यान, गणेश चौक उद्यानासह प्रलंबित असलेल्या नागरी विकासकामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केली. दरम्यान, मोरवाडी येथील मनपा रुग्णालयात आयुक्तांनी अचानक पाहणी केली असता त्याठिकाणी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. सिडको भागातील प्रश्न हे महासभा तसेच प्रभागसभेत उपस्थित केल्यानंतरही मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांनी प्रलंबित विकासकामांची पाहणी करण्याची विनंती आयुक्तांना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेत सिडको भागातील प्रभाग २४, २५ व २९ मध्ये पाहणी दौरा केला. सुरुवातीला प्रभाग २९ मधील उघड्या नाल्यांत साचणारी घाण, बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच उत्तमनगर ते पवननगर भागातील रस्ता कॉँक्रिटीकरण करण्याबाबत नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग यांनी आयुक्तांकडे मागणी केली.  यावेळी आयुक्तांनी पेलिकन पार्कबाबत न्यायालयीन बाब तपासून पार्कचे नव्याने डिझाइन तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यानंतर प्रभाग २५ चे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पवननगर भागातील पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून ते पाणी येथील दुकानदार व नागरिकांच्या घरात जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत येथील पाणी जाण्यासाठी स्वतंत्र आरसीसी गटार बांधून व्यवस्था करण्याचे सांगितले. यावर आयुक्तांनी संबंधित काम मार्गी लावावे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.प्रभाग २४ चे नगरसेवक कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी गणेश चौक उद्यानाची झालेली दुरवस्था, बाळासाहेब ठाकरे उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने उद्यानातील पथदीपांसह जॉगिंग ट्रॅक, लॉन्सच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. उद्यानात तातडीने सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची गरज असल्याचेही नगरसेवकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. बडदेनगर येथील सपना टॉकीजजवळील रस्त्याचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावावे तसेच याच मार्गावरील एका इमारतीच्या बाजूला असलेल्या मनपाच्या मोकळ्या भूखंडाला संरक्षक जाळी लावण्याबाबतही सांगण्यात आले.