शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटन होऊन मुलतानपुरा रुग्णालय अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST

स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी मुलतानपुरा रुग्णालयाचा विषय उपस्थित करण्यात ...

स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी मुलतानपुरा रुग्णालयाचा विषय उपस्थित करण्यात आला. मुलतानपुरा रुग्णालय सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा केला, असे राष्ट्रवादीच्या समिना मेमन यांचा दावा असून, स्वातंत्र्य दिनाचे मुहूर्त साधून त्यांच्याच पक्षाचे सुफी जीन यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करून घेतले. त्यामुळे मेमन नाराज आहेत. या कामाचे श्रेय कोणीही घ्या, मात्र रुग्णालय सुरू तर व्हायला हवे ना, असे सांगून त्यांनी रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून वीजपुरवठा खंडित आहे. तसेच एक्स-रे मशीनदेखील सुरू झालेले नाही, मग असे असताना उद्घाटनाची घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी केला. तर रुग्णालयाचे वीजपुरवठ्याचे थकीत बिल भरण्यासाठी एक लाख १९ हजार रुपयांचा धनादेश तयार आहे. मात्र, महावितरणने पेनॉल्टी लावली आहे, तीही भरायची आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. तर प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली उद्घाटन आणि अन्य कामे करीत असल्याचा आराेप समिना मेमन यांनी केला.

रुग्णालय सुरू होत नसल्याने मनसेचे सलीम शेख यांनीही नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, शहरातील जंतुनाशक फवारणीबाबतदेखील कर्मचाऱ्यांकडून दुरुत्तरे केल्याचा आरोप योगेश हिरे यांनी केला. सलीम शेख यांनी सुट्टीच्या दिवशी कामावर येणाऱ्या कामगारांना नियमानुसार त्या दिवसाचे दुप्पट वेतन दिले जात नसल्याचा प्रश्न उपस्थित केला.

इन्फो..

मीटर नाही म्हणून वीजपुरवठा नाही...

नाशिक महापालिकेतर्फे मुलतानपुरा रुग्णालय पाडून नव्याने बांधण्यात आले आहे. कोराेनाकाळात नवीन रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. कारण वीजबिल थकल्याने महावितरणने रुग्णालयाचा पुरवठा खंडित केला होता. आता महापालिका थकीत रक्कम भरण्यास तयार आहे, मात्र मीटरच शिल्लक नाही, असा प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी उघड केला.