शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड गटात चुरशीची लढत

By admin | Updated: February 14, 2017 00:10 IST

रस्सीखेच : बागायती पट्ट्यात महिला राज अवतरणार

 दत्ता महाले/संतोष अहेर येवलाराजकीय, सामाजिकदृष्ट्या येवला तालुक्यातील मुखेड गटात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस यांच्यात वरकरणी चौरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. मुखेड गट, मुखेड गण आणि चिचोंडी गणात महिलांचे आरक्षण राहिल्याने मुखेडच्या बागायती पट्ट्यात महिला राज अवतरणार हे आरक्षणाने निश्चित केले आहे.मुखेड गटात मविप्रचे संचालक व सहकार नेते अंबादास बनकर यांचा वरचष्मा राहिला आहे. माजी आमदार मारोतराव पवार यांचा नात्यागोत्याचा मोठा जत्था या भागात आहे. दरम्यान, बनकर राष्ट्रवादीत, तर पवार सेनेत आहे. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मानणाराही मोठा वर्ग मुखेड परिसरात आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटवाटपात बनकर यांनी सामंजस्य दाखवल्याने मुखेडसह पाटोदागटात दमदार पाय रोवता आला. मात्र भुजबळ यांच्या नेतृत्वाविना निवडणुकीत उतरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न करीत मुखेड गटातून कमल भाऊसाहेब अहेर यांना उमेदवारी दिली आणि चुरस निर्माण केली.या गटात राष्ट्रवादीच्या वतीने विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांना तत्कालीन आमदार छगन भुजबळ व स्थानिक नेत्याचे पाठबळ लाभले. व त्यांना संधी मिळाली होती. मात्र आता स्थानिक नेत्यांनी तालुक्यावर पुन्हा आपली पकड आणि आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल या उद्देशाने व्यूहरचना केली आहे. त्यामुळे या गटात शिवसेना नेते संभाजीराजे पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनी शिवसेनेचा उमेदवार देऊन राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात मातब्बर उमेदवारांना संधी देऊन निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. या गटाचा इतिहास लक्षात घेऊन राष्ट्रवादीने विद्यमान सदस्य कृष्णराव गुंड यांच्या सौभाग्यवती कुसूम गुंड यांना या गटातून संधी दिली आहे, तर शिवसेनेने कमल अहेर यांना संधी देऊन राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. मुखेड ग्रामपंचायतीमध्ये जि. प. सदस्य कृष्णराव गुंड व भाऊसाहेब अहेर यांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली असून, येत्या निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तसेच या गटातून भाजपाने देखील सुरेखा कदम यांना उमेदवारी दिली आहे, तर कॉँगे्रसने संगीता अहेर यांना या लढतीत उतरविले असून, ज्योती पानसरे व अस्मिता साताळकर हे दोन अपक्षदेखील या लढतीत पक्षीय उमेदवारांना अडचणीचे ठरण्याची चर्चा आहे.