शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

भाबडबारी घाट दुरुस्तीसाठी आंदोलन

By admin | Updated: November 19, 2015 22:25 IST

दुर्लक्ष : टोल प्रशासन, बांधकाम विभागाविषयी नाराजी

देवळा : विंचूर-प्रकाशा-छडवेल राज्यमार्ग क्र.७ वरील देवळानजीकच्या भाबडबारी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व्हावे व वळण रस्त्यावरील डोंगराच्या खडकांचे नोज कटिंग करून घाटातील खोलदरीच्या बाजूकडील संरक्षक भिंतीची उंची वाढवावी आदि मागण्या अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीकडे करूनही त्याकडे संबंधित दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी दुपारी झालेल्या पेट्रोल टँकरच्या अपघातस्थळी सटाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भाबडघाटात होणारे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या सुधारणासंबंधी निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले आहे की, भाबडबारी घाटातील रस्त्यावरील वळणावर डोंगराळ खडकाच्या भागामुळे लहान-मोठे वाहनचालक वाहनदृष्टीस न पडल्यामुळे छोटे मोठे अपघात होतात. बाजूला १०० ते १५० फूट खोल दरी असून, यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत.खोलदरीच्या बाजूने संरक्षण भिंतीची उंची कमी आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचं तसेच दिशादर्शक, रेडियम रिप्लेक्टर फलक झेब्रा क्रॉसिंग पट्टे, कॅट आय ठिकठिकाणी बसविण्यात यावे. याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी अधीक्षक अभियंता नाशिक यांना मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना करण्यात आल्या.मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मनमाडकडून पिंपळनेरकडे जाणारा पेट्रोलने भरलेला टँकर (एमएच १८ एम ५५६३) व नवापूर- पुणा एसटी (एमएच ४० एन ९६१६) यांच्या अपघात होऊन टँकर संरक्षक भिंत तोडून दरीत जाता जाता वाचल्याने मोठी वित्तहानी व जीवितहानी टळली.या अपघातानंतर सदर टँकरजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी दादाजी खैरनार, गिरीश सोनवणे, मोहित सोनवणे, जावेद सय्या, राजबधान, सुदर्शन खैरनार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)