शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

By admin | Updated: June 25, 2014 00:14 IST

कांदाप्रश्नी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

 

नाशिक : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ३०० डॉलर केले असून, त्याचा निषेध करून ते शून्य डॉलरवर आणावे आणि जिल्हा बॅँकेकडून होत असलेल्या कर्जवसुलीपोटी जप्तीची मोहीम तातडीने रोखावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन घेऊन आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारत, जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न काढता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केले. सदरच्या निवेदनानुसार गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे मिळणेही मुश्किल झालेले असताना केंद्र सरकारने कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावेत, यासाठी निर्यातमूल्य ३०० डॉलर्स केले असून, ते शून्य डॉलर्स करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून विलंब केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा बॅँकेकडूनही थकबाकीदार शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जात असून ती थांबवावी, तसेच कर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज मंजूर करावे. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिला. यावेळी संघटनेचे दीपक पगार, बाबा गोडसे, बापू जाधव, श्रावण देवरे, विजय मोरे, अभिमन पगार, सिकंदर मोरे, रवींद्र शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.