शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोदेच्या सन्मानासाठी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:05 IST

नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीच्या सन्मानासाठी नमामि गोदा ही समाजाची चळवळ आता समाजातूनच सुरू होत आहे. त्यासाठी स्थापन झालेल्या फाउंडेशनचा औपचारिक शुभारंभ शनिवारी (दि. १९) विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या हस्ते होणार आहेत. यावेळी गोदारक्षक व गोदासेवकांची नियुक्ती होणार आहे. तर रविवारी त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानापासूनच वारी गोदावरी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.देशभरातील प्रमुख मोठ्या नद्यांना सन्मान देऊन निर्मळ करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामि गंगा, नमामि नर्मदा हा त्यातीलच एक भाग होय. परंतु गोदावरीसाठी शासनाऐवजी समाजातून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सजग समाजाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच चळवळ उभी करण्यात येणार आहे. गोदावरीप्रेमी म्हणून यापूर्वीही उपक्रम राबविणारे राजेश पंडित तसेच अभिनेते चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, मिलिंद दंडे, अ‍ॅड. शिरीष दंदणे व डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १९) दुपारी तीन वाजता उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. विख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांच्या प्रेरणेतूनच ही चळवळ उभी राहत असल्याने त्यांच्या हस्तेच नमामि गोदाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. फाउंडेशनने भावी पिढी असलेल्या शाळा, महाविद्यालयातील मुलांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी तीस शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना गोदावरी संदर्भात विविध स्पर्धा आणि अन्य प्रकल्प सादर करण्याचा उपक्रम राबविण्याची संधी दिली होती. त्या माध्यमातून गोदावरी चळवळीत योगदान देऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अशा पाचशे जणांना गोदावरी रक्षक आणि गोदावरी सेवक या रचनेत सामावून घेतले जाणार आहे. त्याची घोषणादेखील याच कार्यक्रमात करण्यात येईल. यानंतर रविवारी दुपारी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी येथून गोदावरीची वारी सुरू करण्यात येणार आहे. वारी ही सेवा धर्म म्हणून केली जाते. गोदावरीची सेवा करण्याचे कार्य नागरिकांमधून आणि विशेषत: गोदावरी नदीकाठी असलेली गावे आणि शहरातील नागरिकांकडून व्हावे यादृष्टीने त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २०) त्र्यंबकेश्वर येथे मोहिमेचा शुभारंभ होईल आणि सोमवारी सायंकाळी पाच वाजता रामकुंडावर समारोप होणार आहे, अशी माहिती राजेश पंडित यांनी दिली.