शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 28, 2017 23:54 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड या गावांच्या सहकारी सोसायटीचे सचिव गेल्या वर्षभरापासून गायब आहे. परिणामी प्रत्येक सोसायटीचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड या गावांच्या सहकारी सोसायटीचे सचिव गेल्या वर्षभरापासून गायब आहे. परिणामी प्रत्येक सोसायटीचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. वारंवार सचिवाची मागणी करूनही नाशिक येथील जिल्हास्तरीय समिती अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने तिन्ही गावच्या सोसायटी अध्यक्षांसह शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षकांनी आमच्यावर अरेरावी करून दमदाटी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शेकडो शेतकऱ्यांच्या हितासाठी निगडित असणाऱ्या सोसायटीमध्ये सचिव नसल्याने शेतकऱ्यांसह पदाधिकारी नवीन सचिव मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये विजय बोराडे यांना सचिव म्हणून नेमणूक देण्यात आलेली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ते गायब आहेत. परिणामी तिन्ही गावातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मिळणारे कर्ज व इतर व्यवहार थांबले आहेत. शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी तिन्ही गावातील शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी वर्षभरापासून नवीन सचिव द्यावा या मागणीसाठी नाशिक येथील शासनाच्या जिल्हास्तरीय समितीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. (वार्ताहर)सचिव मिळेपर्यंत कार्यालयातचसोमवारी पिंपळगाव मोर सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ काळे, अधरवड सोसायटीचे चेअरमन नवनाथ बऱ्हे, धामणीचे चेअरमन रंजना भोसले, माजी चेअरमन राजाराम काळे, जगन बेंडकोळी, रामकृष्ण बऱ्हे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, दत्तू काळे, शिवाजी काळे, धनाजी भोसले, कांतिलाल भोसले, सुदाम भोसले आदि शेतकऱ्यांनी नाशिकच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कार्यालयीन अधीक्षकांनी दुरुत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी तिन्ही गावाला नवीन सचिव मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.